शिक्षक पत्रकार शंकर भामेरे यांचा असाही प्रामाणिकपणा !

Khozmaster
2 Min Read

बैंक खात्यावर आलेले ४० हजार केले परत

सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत/.जामनेर तालुक्यातील पहूर येथे दिनांक २९/३/२०२३ रोजी येथील महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित सावित्रीबाई फुले माध्यमिक शिक्षक तथा पत्रकार शंकर रंगनाथ भामेरे यांनी त्यांच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यावर चुकून आलेले ४० हजार रुपये संबधीतास प्रामाणिकपणे परत केले . आज भौतिक सुखाच्या मागे जग धावत असताना अनेकदा अनैतिक तथा भ्रष्टाचारी मार्गाचा अवलंब होताना दिसतो . मात्र पहूर येथील शिक्षक तथा पत्रकार शंकर रंगनाथ भामेरे यांच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ३५ ४४ ६८ ६० ० ३९ या खात्यावर रोहिदास बारकू पाटील , रा .कृष्ण दर्शन सोसायटी भडगाव रोड , पाचोरा यांच्या ९७६६६ ४४ ४००६ या फोन पे वरून काल दिनांक २८/३/२०२३ रात्री साडे वाजता ४० , ००० रुपये चुकून पाठवल्या गेले . याविषयी शंकर भामेरे यांनी शिक्षक मित्र हरिभाऊ राऊत , पोलीस निरीक्षक प्रतापराव इंगळे , गोपनीय विभागाचे गोपाल गायकवाड यांना माहिती दिली .आज बुधवारी ( ता . २ ९ ) सकाळी साडे अकरा वाजता एसबीआय बँकेच्या एटीएम सुविधेद्वारे रोहिदास पाटील यांना शंकर भामेरे यांनी त्यांच्या खात्यावर आलेले ४० हजार रुपये प्रामाणिकपणे परत केले . यावेळी बँक व्यवस्थापक शफिक पिंजारी , ग्राहक सेवा केंद्राचे संचालक तुषार बनकर , पत्रकार प्रवीण कुमावत , सादीक शेख , अशोक बनकर , सुनिल पवार आदींची उपस्थिती होती . त्यांचे वडील तथा श्री क्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष पुजारी शिवभक्त रंगनाथ महाराज यांना देखील बस स्थानक परिसरात सापडलेले साडेनऊ हजारांचे पाकीट त्यांनी संबंधितास प्रामाणिकपणे परत केले होते .शंकर भामेरे यांनी खात्यावर आलेले पैसे परत करून एक आदर्श निर्माण केला आहे . त्यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे .

 

0 9 3 7 3 7
Users Today : 18
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *