उच्च शिक्षण घेऊनही चित्रकलेला प्राधान्य देणारी रुचिता!

Khozmaster
2 Min Read

बुलडाणा /जिल्ह्यातील बावनबीर या गावात वास्तव्यास असलेले श्री. प्रमोद आकोटकर व सौ. अंबिका आकोटकर यांची मुलगी रुचिता हिने माझ्या वाढदिवसानिमित्त स्वतः पेन्सिलने रेखाटलेले चित्र मला भेट देऊन प्रभावित केले.

लहानपणापासूनच रुचिताला कलेची आवड होती, इयत्ता चौथीपासूनच लक्ष वेधणारे चित्र ती रेखाटत आहे. विशेषतः तिची आई सौ.अंबिका आकोटकर यांनी वेळोवेळी तिच्या कलागुणांना प्रोत्साहन देत तिच्या कलेस वाव दिला. सोबतच वडिलांच्या सहकार्यामुळे तिला कलेला जोपासणं आणखीन सोपं झालं. प्राथमिक शिक्षण गावी पूर्ण करून जी.एस. महाविद्यालय, खामगाव येथून पदवी घेऊन पदव्युत्तर शिक्षण व्ही.एम.व्ही, अमरावती येथे पूर्ण केले. “रंग न वापरताही तुमच्या चित्रांमध्ये जिवंतपणा आहे “, अशी दाद तिला कलाप्रेमींकडून नेहमीच मिळते.

रुचिताचे लग्न चिखलीतील सॉफ्टवेअर इंजिनिअर वैभव श्रीकृष्णजी येंडोले यांच्याशी २०२२ मध्ये झाले. लग्नानंतर तिने पुढील वाटचालीचे श्रेय पती श्री.वैभव यांना दिले. बहुदा लग्नानंतर छंद टाळावे लागतात परंतु सासर मंडळीकडून मिळालेल्या पाठिंब्याचा देखील तिच्या प्रवासात मोठा वाटा आहे. सासरे श्रीकृष्णजी येंडोले यांच्या सहकार्याबद्दल देखील ती ऋणी आहे.च्च शिक्षण घेतले कि आपण नोकरीच्या शोधात लागतो किंवा वडिलोपार्जित काही व्यवसाय, धंदा असेल तर त्यात गुंतून जातो, परंतु कलेची कोणतीही पार्श्वभूमी नसताना हा छंद जोपासणे आणि त्यात यशस्वी होणे असे क्वचितच घडते. प्राणीशास्त्रामध्ये पदव्युत्तर होऊन PET परीक्षा उत्तीर्ण झालेल्या रुचिताने पीएचडी न करता आपल्या कलेला प्राधान्य दिले आणि “Artbuddy4u” ह्या नावाने कलेचा व्यवसाय सुरू केला. चित्रकार रुचिता यांची कलात्मक क्षमता विस्तीर्ण आहे. ती केवळ चित्र च नाही तर उत्कृष्ट रांगोळी, मेहंदी, रेजीन आर्ट, ग्लास पेंटिंग, कॅलिग्राफी,आरीवर्क, विणकाम, क्राफ्ट्स, बेकिंग इत्यादी कलांमध्ये देखील निपुण आहे. अशा कलांसाठी रुचिताला तीन विश्वविक्रमांसाठी नामांकित केलेले आहे. तिच्या पोर्ट्रेट ड्रॉईंगना अमेरिका आणि कॅनडा या देशातून देखील मागणी आलेली आहे. वाढदिवस, लग्नसोहळा तसेच इतर कार्यक्रमानिमित्त भेटवस्तू म्हणून तिने रेखाटलेल्या चित्रांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ती तिच्या चित्र व इतर कला इच्छुक लोकांना तसेच विद्यार्थ्यांना शिकवते.  रुचिता हिच्या पुढील कलाप्रवासाला हार्दिक शुभेच्छा!

 

0 9 3 7 3 7
Users Today : 18
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *