देऊळगाव राजा प्रतिनिधी राजेश पंडित /शहरापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या जाफराबाद रोडवरील शिराळा फाट्यावर अज्ञात स्वाराने दुसऱ्या दुचाकीला दिलेल्या धडकेत महिला गंभीर जखमी झाली होती त्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला त्यावरून अज्ञात दुचाकी स्वराविरुद्ध 29 मार्चला देऊळगाव राजा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे
सविस्तर वृत्त असे की फिर्यादी सतीश रामदास साबळे वय 33 वर्ष राहणार रांजणगाव एमआयडीसी परिसर संभाजीनगर हे त्यांच्या पत्नी ज्योती आणि आणि दोन मुलासह सहा मार्च रोजी जाफराबाद तालुक्यातील खानापूर कडे त्यांची दुचाकी क्रमांक MH 20 GB 4714 वरून जात होते त्यावेळेस जाफराबाद रोडवरील शिराळा फाट्यादरम्यान समोरून येणाऱ्या अज्ञात दुचाकी स्वाराने त्याच्या ताब्यातील दुचाकी निष्काळजीपणे चालवून फिर्यादी यांच्या मोटरसायकलला जोराची धडक दिली त्यामध्ये त्यांची पत्नी ज्योती या खाली पडून त्यांच्या डोक्याला जबर मार लागला त्यांना इलाजासाठी जालना येथे हलविले असता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात दुचाकी स्वराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा अधिक तपास पोलीस शेड कॉन्स्टेबल रामेश्वर जायभाये आहे करीत आहेत
Users Today : 18