केंद्र सरकारच्या कारवाई विरुद्ध सातत्याने संघर्ष करणार – अँड.संजय राठोड

Khozmaster
3 Min Read

बुलडाणा : ( खोज मास्टर ) अकील शाह/ केद्राच्या हुकूमशाही धोरण व आमचे नेते राहुल गांधी यांच्या विरुद्धच्या कारवाईच्या विरोधात काँग्रेस प्राणपणाने लढणार.लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी फक्त बोलघेवड्या चर्चा करण्यापेक्षा काँग्रेस कार्यकर्त्यांच्या खांद्याला खांदा लावून सामान्य नागरिकांनी ही रस्त्यावर उतरणे काळाची गरज आहे. राहुलजींवर होत असलेल्या कार्यवाहीचा प्रकार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष ॲड संजय राठोड व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष विजय अंभोरे यांच्या नेतृत्वात मुक मोर्चा काढण्यात आला.यावेळी स्थानिय संगम चौक येथून आज शुक्रवारी या मूक मोर्च्याला प्रारंभ झाला. मोर्च्याच्या अग्रभागी आमदार धीरज लिंगाडे, श्याम उमाळकर, लक्ष्मणकाका घुमरे, बाबासाहेब भोंडे, ऍड विजय सावळे, तेजेंद्रसिंग चौहाण, विनोद भैय्या बेंडवाल,अँड.गणेशसिंग राजपूत, तुळशीराम नाईक हे प्रमुख नेते होते. जयस्तंभ चौक, बाजार पेठ, जनता चौक, कारंजा चौक, भोंडे सरकार व तहसील चौक मार्गे कोणत्याही घोषणा न देता निघालेला हा मोर्चा लक्षवेधी ठरला. मोर्च्याचा समारोप स्थानिय हुतात्मा स्मारक येथे करण्यात आला. यावेळी तिथे सत्याग्रह करण्यात येऊन कारवाईचा मौन निषेध करण्यात आला.सोबतच मोर्चात प्रा. संतोष आंबेकर, प्रमोद अवसरमोल, वसंत देशमुख, चित्रांगण खंडारे, नंदकिशोर बोरे, डॉ. देवकर, गणेश बस्सी, बंडू काळवाघे, राजेश पोलाखरे विठ्ठलराव चव्हाण, साहेबराव डोंगरे, सुनील पाटील, सुरेश इंगळे, मिलिंद जयस्वाल, मोईन काझी, संतोष पाटील, एकनाथ चव्हाण, विपुल राठोड, सुनील सपकाळ, अभिजीत देशमुख, सोपान पानपाटील, सुनिल पनपालिया, सय्यद इरफान, रियाझ शेख, गौतम मोरे, सुरडकर, निलेश हरकल, अल्ताफ खान, शाम कानडजे, नितीन राठोड, संदीप सोनूने,शैलेश खेडकर,अलिम शाह पत्रकार,ऋषभ साळवे, उमेश चव्हाण, महिला काँग्रेस च्या मंगला पाटील, नंदिनी टारपे, कल्पना पाटील, सीमा मेहेंगे, प्रीती भगत, ज्ञानेश्वरी पाटील, आशा इंगळे, मीना हिवाळे, कमलाताई गवई, रंजना चव्हाण, अश्विनी मोरे, पूजा मिरकुटे, रेखा वानखेडे, जोत्सना जाधव.NSUI चे कुनाल काळे,सय्यद मतीन,भुषन खडारे, सुमित संगत,आदेश राठोड, आमण चव्हाण,गैरव संगत ,रोहित राजे ,निखिल सरकटे,आर्यन साबळे, शाश्वत नाईक, हर्षल हिवाळे,स्वस्तिक तिडके, सोहम जाधव, यश चव्हाण, प्रतीक पारस्कर, आनंद गवई, ओम गावडे,ओम जाधव , पृथ्वीराज चव्हाण, हर्षद काळोशी, अतुल पाटील, ऋतिक साळवे, शुभम चव्हाण, अतुल राठोड, मयूर चव्हाण, विशाल आरक, विकी इंगळे, वृषभ तायडे ,हर्षल पाटील, आदेश इंगळे, तथागत हिवाळे, अजित इंगळे, कबीर शुभम गाडेकर, संकेत जाधव, शुभम घुगे यांच्या सोबतच जिल्हा काँग्रेस पदाधिकारी,युवक काँग्रेस पदाधिकारी, विद्यार्थी काँग्रेस पदाधिकारी , कार्यकर्ते सहभागी झाले होते.7

 

0 9 3 7 3 7
Users Today : 18
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *