डाभा येथील बॅटरी चोरणा-या दोन चोरटयांना केले जेरबंद

Khozmaster
2 Min Read

सपोनि भरत मोरे यांची धडाकेबाज कारवाई चार तासात लावला शोध 

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सोयगाव /तालुक्यातील डाभा येथील बटरीकचे चोरीचे प्रमाण जास्त वाढले होते.याकरिता मा. पोलीस अधिक्षक मनिष कलवानिया यांनी जिल्हयातील चोरी करणा-याचा चोरटयांचा शोध घेवून त्यांना जेरबंद करण्याबाबत सुचना सर्व प्रभारी अधिकारी यांना दिल्या आहेत.

यावरुन सिल्लोड उपविभागिय पोलीस अधिकारी डॉ. विजय मराठे साहेब यांनी अशा गुन्हयांचा जलद गतीने तपास करण्याबाबत मार्गदर्शन करुन गुन्हे उघडकिस आणुन अशा घटनांना आळा बसणे कामी मार्गदर्शन केले. यावरुन फर्दापुर पोलीस स्टेशनचे पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत मोरे यांनी तात्काळ तपास पोलीस पथकासह फर्दापुर शिवारातील नांदातांडा गांवामध्ये गु.र.नं. 41/2023 कलम 379 मध्ये फिर्यादी नामे प्रा.मदन मुरलीधर डोखळे रा. डाभा ता. सोयगांव यांचे टॅक्टरची बॅटरी चोरी झालेची फिर्यादीवरुन गुन्हा रजिस्टरी दाखल केला त्यांचा तपास मध्ये सपोनि भरत मोरे व त्यांचे पोलीस पथकास गोपणीय बातमी मिळाली की, नांदतांडा मधील एक इसम यांने सदरची चोरीची बॅटरी घेतल्यांची गोपणिय बातमीदारामार्फत बातमी मिळाली त्याबाबतमीची त्यांनी तात्काळ खात्री केली असता आरोपी नामे किशोर मोरसिंग चव्हाण वय 28 वर्ष व्यवसाय शेती व मजुरी रा. नांदातांडा ता. सोयगांव यांने खरेदी करुन तो त्यांच्या स्वतः च्या टॅक्टरमध्ये वापरत आहे असी माहिती मिळताच सपोनि भरत मोरे व त्यांचे पथकांने वरील इसमांस ताब्यात घेतले त्याने कबुल केले की, सदरची बॅटरी ही आदित्य तुकाराम राठोड रा. नांदातांडा यांनीच चोरी करुन त्याला विकलेली आहे सदर गुन्हयात अटक आरोपी यांचे कडुन 10,000/- कि.ची Global कंपणीची ट्रॅक्टर मध्ये वापण्यात येणारी बॅटरी हा मुददेमाल मिळाला असल्यांने तो जप्त करण्यात आला आहे. सदर ची कार्यवाही पोलीसांनी 4 तासांच्या आत करुन वरील दोन्ही आरोपी पकडले यांना जेरबंद केलेले आहे. सध्या आरोपीतांना मा. न्यायालयाने 03 दिवसांची पोलीस कस्टडी दिलेली आहे सदर वरील दोन्ही आरोपी पोलीस कस्टडीमध्ये असुन पोलीसामार्फत त्यांचे आनखी कोणी साथीदार आहेत काय तसेच चोरीचा माल घेतलेले अजुन काही इसम आहेत काय यांचा तपास पोलीस करीत आहेत.नमुद कार्यवाई ही सपोनि भरत मोरे मार्गदर्शणाखाली पोहेकॉ मिरखॉ तडवी, मसुद तडवी, निलेश लोखंडे, पोकॉ, अंकुश भवर, पो.कॉ.प्रकाश कोळी, भरत कोळी, सतिश हिवाळे, प्रदिप बेदरकर, मयोको कल्पना चावे यांनी मिळून केलेली आहे.

 

0 9 3 7 3 7
Users Today : 18
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *