छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत वैजापूर /सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा,संघ लोकसेवा आयोग परीक्षा , तसेच बँकिंग परीक्षा तयारी व इतर स्पर्धात्मक परीक्षेच्या तयारी साठी सर्व प्रकारची पुस्तके उपलब्ध व्हावीत,त्यांना अभ्यास साठी सर्व सोयीयुक्त जागा उपलब्ध व्हावी,तज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन मिळावे म्हणून शहरातील निवारा नगरी येथे
सुसज्ज “स्टडी सर्कल”उभारण्यासाठी शासनाकडून एक कोटी रुपये मंजूर करून आणले असे प्रतिपादन वैजापूर-गंगापूर तालुक्याचे दमदार आमदार प्रा,रमेश पाटील बोरनारे यांनी भगगाव येथील रोंम्बस प्रायमरी इंग्लिश स्कुल च्या ५ व्या वर्धापन दिन निमित्त आयोजित कार्यक्रमात शुक्रवार(ता,३१)रोजी केले,ते पुढे म्हणाले की,तालुक्यातील जि, प,च्या ४०शाळात पेव्हर ब्लॉक बसविण्यात येत असून तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या गुणात्मक विकास साठी शाळा बाह्य व अंतर्गत विकास करण्यासोबत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गुणात्मक शिक्षण द्यावे या साठी ही लक्ष घालणार असल्याचे ते पुढे बोलले,शिक्षण हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे प्रमुख माध्यम असल्याने पालक वर्गाने व शिक्षक वर्गाने मुलां-मुलींना गुणात्मक शिक्षण मिळावे म्हणुन सर्वंकष प्रयत्न करावे असे आवाहन बोरणारे यांनी केले,से,नि, शिक्षणाधिकारी
धोंडीरामसिंह राजपूत यांनी तालुक्यातील शाळांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून द्यावे, शालेय परिसर विद्यार्थ्यांना मनभावक असावा, पुरेसा शिक्षकवर्ग असावा, इत्यादी मागण्या राजपूत यांनी मांडल्या त्यावर आ,बोरनारे यानी वरील बाबी कडे जातीने लक्ष देऊन विद्यार्थी गुणवता वाढीसाठी सर्वंकष प्रयत्न करणार असे आश्वासन दिले,रोम्बस शाळेचे व्यवस्थापक डॉ,साईनाथ पेहरे,सौ,प्राणिता साईनाथ पेहरे यांनी मान्यवरांचे स्वागत केले,सौ, प्रणिता पेहरे यांनी प्रास्ताविक केले,या प्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र पा,साळुंके,शहर प्रमुख पारस घाटे,भगगाव सरपंच अशोक अण्णा जगताप,युवा सेना प्रमुख श्रीकांत साळुंके,श्रीराम गायकवाड, माजी सरपंच सुखदेव गायकवाड, उपसरपंच शरद काळे,संजय क्षीरसागर, वैजापूर नगरसेवक दशरथ बनकर, गणेश खैरे,बजरंग मगर,सीताराम पाटील वैद्य,अमोल बावचे, शशांक पाटील,श्रीमती कमळ पेहरे,शंकर गायकवाड, डॉ, गणेश अग्रवाल, ग्रामपंचायत सदस्य हरिभाऊ जगताप,आप्पासाहेब पवार,मनोज शेटे,योगेश गायक-
वाड, बापू भैया,संतोष वाघ,रामकीसन जोरे,वाल्मिक जगताप,विठ्ठल जगताप,बापू देशमुख,वैशाली पेहरे,प्रदीप साळुंके,डॉ,पवार, श्री आहुजा, पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता, सुत्रसंचलन व आभार धोंडीराम ठाकूर यांनी मानले,
Users Today : 18