आझाद हिंदची सामाजिक चळवळ देशगोरव नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या क्रांतिकारी विचार कार्याला प्रमाण मानून 23 जानेवारी 1996 ला मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यात स्थापित झाली. तीन दशकात आझाद हिंदची चळवळ महाराष्ट्र,मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेशापर्यंत कार्यरत झाली. बुलढाणा शहरापूर्ती सुरू झालेली आझाद हिंदची चळवळ राष्ट्रभक्ती, निस्वार्थ समाजसेवा, सर्वधर्मसमभाव, राजकारण विरहित या चार मूलभूत आधारस्तंभावर प्रतिष्ठापीत झाली. तीन दशकांच्या कालावधीत आझाद हिंद ने सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, साहित्यिक, क्रीडा, शेतकरी, महिला, विद्यार्थी -विद्यार्थिनी, पीडित परितक्ता महिलांच्या उत्थानासाठी भरीव कार्य केले. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात तीन दिवसीय छत्तीस तास व्यक्तिमत्व विकास शिबिर घेऊन प्रत्येक कार्यकर्ता कॅडरबेसवर तयार केला. कार्यकर्त्यांना समाजातील समस्या सोडविण्यासाठी प्रशिक्षित केले. प्रशिक्षित कार्यकर्त्यांची फौज निर्माण केली. समाजामध्ये विविध प्रश्नांवर आवाज उठवणाऱ्या लढाऊ महिला कधी नव्हे समोर आल्या. पाहता पाहता नियोजनबद्ध, अभ्यासपूर्ण आंदोलनात्मक तयारी करून रस्त्यावर लढा देणाऱ्या जिगरबाज कार्यकर्त्यांची लढाऊ फौज निर्माण झाली. अशा सोळा विंग्स आझाद हिंद अंतर्गत कार्यरत झाल्या. छोटा मोठ्या समस्यांसाठी गाव पातळीवर समित्या स्थापन झाल्या. सदर समिती अंतर्गत गावातील छोट्या समस्या गाव पातळीवर सोडविण्याचा प्रयत्न झाला. असंख्य भांडण तंटे, जमिनीचे वाद, आरोग्याच्या समस्या, प्रशासकीय योजनांचा लाभ गाव पातळीवर दिला जाऊ लागला. त्यामुळे आझाद हिंद ची पाळीमुळे ग्रामीण भागात प्रामुख्याने रोवल्या गेली. गाव तेथे शाखा ब्रीद न ठेवता माणूस तेथे शाखा, महिला तिथे शाखा कामाच्या माध्यमातून निर्माण करण्याचा प्रयास आझाद हिंद च्या टीमने केला. राजकीय नेत्यांच्या आश्वासनांना कंटाळलेल्या सामान्य नागरिकाला न्याय मिळवून देण्यासाठी खऱ्या अर्थाने आझाद हिंद ने वसा उचलला. तो अविरत सातत्याने सुरू ठेवण्यासाठी आझाद हिंद ने स्वतःच आर्थिक नियोजन केले.प्रत्येक कार्यकर्त्याकडून मासिक दहा रुपये व पदाधिकाऱ्याकडून १०० रुपये घेत मोठा निधी उपलब्ध झाला. त्यामधून निराधारांना आधार झाला, शैक्षणिक गरजा,वैद्यकीय सुविधा, प्रसंगी जीवनावश्यक सुविधा पुरविण्याचे कामही करता आले. त्यामधूनच कोरोना काळात आझाद हिंद ने 180 दिवस सकाळ संध्याकाळ चार हजार लोकांना अन्नदान करण्याची मोहीम बुलढाणा जिल्ह्यात राबवली. आझाद हिंदच्या प्रशिक्षण शिबिरातच वीस रुपयांमध्ये विवाह जुळले. एक हार मुलाने आणि एक हार मुलीने आणायचा आणि लग्नाचा खर्च मुलीच्या नावावर फिक्स डिपॉझिट करायचा. या तत्त्वप्रणालीवर असंख्य विवाह जोडले. ग्रामीण भागातील मंदिरांचा, बंद पडलेल्या संस्थांचा जिर्णोद्धार केला. त्यांना जिवंत करण्याचे कार्य मोठ्या प्रमाणात झाले.आझाद हिंदच्या प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून, श्रमदानाच्या माध्यमातून प्रत्येक गावात प्रशासनाच्या योजना पोहोचवण्याचे भरीव कार्य सुरू झाले. प्रशिक्षण शिबिर आणि श्रमदानातून कार्यकर्त्यांना अष्टपैलू कार्यकर्ता होण्याची संधी मिळाली. कार्यकर्त्यांना त्यांची जबाबदारी कृतीतून शिकवण्याची एक कला आझाद हिंद ने कृती प्रवण विकसित केली. कोणताही बळेजाव नाही, कोणतेही पेपर बाजी जाहीरात नाही. प्रत्यक्ष कार्य करण्याच्या कृतीला आणि एक कणखर अष्टपैलू कार्यकर्ता घडवण्याच्या कृतीला समाज मनाने स्वीकारले. म्हणून तळागाळात अष्टपैलू कार्यकर्ते निर्माण करण्याचं मोठं जाळ मागील तीस वर्षात आझाद हिंद ने विनल. त्यामुळेच कोणतेही राजकीय पाठबळ नसतांनाही आझाद हिंद ची चळवळ सातत्य आणि गतिमान होत राहीली.
ग्रामीण भागातील अशिक्षित, शेतकरी, कष्टकरी, कामगारांना प्रशिक्षण देऊन गावातील परिसरातील समस्या तक्रारी सोडवण्यासाठी ओळखपत्र देन्यात आले. प्रत्येक ग्राम पातळीवरील ग्रामसेवक पासून तहसीलदार पर्यंत रीतसर निवेदन, मागणी करीत समस्या मार्गी लावण्याचे कार्य सोपविण्यात आले. पाहता पाहता गावकरी ते राव न करी ही संकल्पना पूर्णत्वास गेली. गावातील प्रत्येक घरातील व्यक्ती आझाद हिंद सोबत जोडल्या गेला. प्रत्येकाचा विश्वास संपादन केला गेला. आज त्याच विश्वासाच्या बळावर आझाद हिंद ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला, विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्या समस्या सोडविण्याचा एक महामार्ग ठरली आहे. आझाद हिंद ने प्रत्यक्ष आझाद हिंद चे नाव न देता ग्रामीण शेतकरी पॅनलच्या माध्यमातून निवडणूक लढविली. महाराष्ट्रातील असंख्य ग्रामपंचायत निवडणुकीत संपूर्ण पॅनल आझाद हिंद ने निवडून आणले.आझाद हिंदचे सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्ते सरपंच झाले. डुबते को आझाद हिंद का सहारा. या वृत्तीप्रमाणे शून्यातून विश्व निर्माण करणारी आझाद हिंदची फौज सरपंच निवडण्यापर्यंत महत्त्वपूर्ण भूमिकेत आली. निस्वार्थ ध्येय, देण्याची वृत्ती आणि सामान्यांचा विश्वास या त्रिसूत्रीवर आझाद हिंद ने शून्यातून विश्व निर्माण करण्याची कला महाराष्ट्राला दाखवून दिली. आज आझाद हिंद ची पाळीमुळे मजबूत करण्यासाठी ज्यांनी सर्वस्व पणाला लावले संपूर्ण जीवन आझाद हिंद साठी समर्पित केले. प्रति आझाद हिंद सरकार महाराष्ट्रात निर्माण केले. असे आझाद हिंदचे संस्थापक अध्यक्ष अँड.सतीशचंद्र रोठे यांच्या कार्याला सलामच.जिंदगी दि है तुने, तो जीने का हूनर भी देना,पाव बक्षे है तुने,तो तोफिया सफर भी देना, अब जब मै बोलू, तो बातो मे असर भी देना असर भी देना*. अशा निस्वार्थ भावनेने सर्वस्व समर्पित करणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांच्या त्याग आणि समर्पणातून उभी राहिलेली आझाद हिंद चळवळ आज महाराष्ट्रातील सर्वसामान्यांचा आधार बनली आहे. आझाद हिंद च्या निस्वार्थ कार्यामुळे प्रतिसरकार आज ग्रामीण भागात निर्माण झाले. राष्ट्रभक्त देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस, छत्रपती शिवराय, फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांवर कार्य करणाऱ्या आझाद हिंदचे प्रत्यक्ष सरकार निर्माण व्हावे ह्याच प्रांजळ शुभेच्छा.धन्यवाद.
शब्दांकन लेखक अकिल शाह शब्बीर शाह,
पत्रकार,बुलढाणा जिल्हा विशेष प्रतिनिधी. दैनिक खोज मास्टर
Users Today : 19