समर्थ कृषी महाविद्यालयात निरोप समारंभ संपन्न

Khozmaster
2 Min Read

तालुका प्रतिनिधी दत्ता हांडे देऊळगाव राजा/डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्न समर्थ कृषी महाविद्यालय देऊळगाव राजा येथे चौथ्या वर्षातील विद्यार्थ्यांना निरोप समारंभ देण्यात आला, याप्रसंगी आर आर सिरीज 2019 – 20 च्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी आपले शिक्षण पूर्ण झाल्याचा आनंद व्यक्त केला, या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ नितीन मेहेत्रे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करत प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग हा आपल्या सोबतच समाजासाठी देखील करावा असे सांगत आयुष्यामध्ये आपण जे कुठले काम करू त्या कामाप्रती आपली निष्ठा सदैव चांगली ठेवत मार्गक्रमण करावे असे सांगितले तर प्रास्ताविकेत प्रा मोहजितसिंह राजपूत यांनी आर आर सिरीजच्या विद्यार्थ्यांना या निरोप समारंभाचा उद्देश स्पष्ट करत नवीन आयुष्याकडे वाटचाल करीत असलेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या, याप्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांन पैकी काही विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करत महाविद्यालयाप्रती असलेल्या आपल्या भावना व्यक्त केल्या. या उपस्थित विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे अध्यक्ष देवानंदजी कायंदे, सचिव नंदाताई कायंदे व जि प सदस्य तथा संचालक मनोज कायंदे यांनी भावी वाटचालीस शुभेच्छा देत विद्यार्थ्यांचे कौतुक केले, या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा सोनाली इंगळे तर उपस्थितांचे आभार प्रा ऋतुजा जाधव यांनी व्यक्त केले, या कार्यक्रमास प्रा नारायण बोडके, प्रा विलास सातपुते, प्रा देवानंद नागरे, प्रा विजय पवार, प्रा वैभव देशमुख, प्रा श्वेता धांडे, प्रा सीताबाई ढाकणे, प्रा शिवकन्या दरेकर, अंतिम वर्षाचे सर्व विद्यार्थी व महाविद्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते.

 

0 9 3 7 3 8
Users Today : 19
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *