ग्रामदैवत श्री रेणुकादेवीच्या यात्रेचे चोख नियोजन करा – आ. श्वेताताई महाले यांचे प्रशासनाला निर्देश

Khozmaster
3 Min Read

 

चिखली : कोटी कोटी भाविकांचे श्रध्दास्थान व बुलडाणा जिल्ह्याचे आराध्य दैवत, चिखली नगरीचे ग्रामदैवत श्री रेणुकादेवीची यात्रा निर्विवादपणे पार पडावी यासाठी प्रशासकीय यंत्रणा व पोलीस विभागाने योग्य ती खबरदारी घेऊन चोख नियोजन करावे व यात्रेकरूंना आवश्यक त्या सुविधा पुरवून नागरिकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यावी असे निर्देश आ. श्वेताताई महाले यांनी प्रशासनाला व पोलीस यंत्रणेला दिले. दि. ३ एप्रिल रोजी यात्रेच्या पूर्वतयारीसाठी आ. महाले यांनी मंदिराच्या सभागृहात आढावा बैठक घेतली. या बैठकीला मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.  आ. श्वेताताई महाले यांनी सर्वप्रथम श्री रेणुकादेवीचे दर्शन घेऊन संस्थान परिसरातील भागाची पाहणी केली तसेच येथील व्यापाऱ्यांशी संवाद साधला. त्याबरोबरच आई रेणुका देवीच्या यात्रेनिमित्त भाविक भक्तांना सर्व सोयीसुविधा पुरवणे तसेच त्यांची गैरसोय टाळणे यासंबंधी सूचना स्थानिक प्रशासनाला दिल्या. महिलांच्या बाबतीत विशेष काळजी साठी प्रशासनाला सूचना व निर्देश या बैठकीत श्री रेणुकादेवीच्या यात्रेनिमित्त प्रशासनाने कशी आणि कोणती तयारी करणे आवश्यक आहे याबाबत आ. श्वेताताई महाले यांनी मार्गदर्शन केले. नगर पालिका प्रशासन,. वीज वितरण कंपनी, पोलीस विभाग आदींनी तत्पर राहून नागरिकांना अत्यावश्यक सुविधा पुरवाव्या तसेच महिलांच्या सुरक्षेची विशेष काळजी प्रशासनाने घ्यावी असे आवाहन त्यांनी केले. शहरातून निघणारी वहन मिरवणूक व वगदी मिरवणूक सुरळीत पार पाडण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त असावा, विशेषतः महिलांच्या सुरक्षेची विशेष काळजी प्रशासनाने घ्यावी शहरातील विविध भागात महाप्रसाद आयोजीत केलेला असतो, त्याकरिता नगर परिषदेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी नेमून दिलेल्या ठिकाणी उपस्थित राहून शहरातील स्वच्छता राखावी, नागरिकांना पिण्याचे पाणी पुरविणे, वगदी मार्गावरील रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करणे, कायदा सुव्यवस्था राखली जाईल याची काळजी घेणे, वगदी व वहन मार्गावरील वीज पुरवठा सुरळीत चालू ठेवणे, नागरिकांच्या सुरक्षेसाठी या मार्गावरील विद्युत लाईन्सची तपासणी करून खात्री करणे आदी सूचना आ. श्वेताताई महाले यांनी यावेळी उपस्थित शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना दिल्या.यात्रेचे पावित्र्य कायम राखा- आ. महाले श्री रेणुका देवीचे वासंतीक नवरात्र व चैत्र पौर्णिमा यात्रा आणि वहन मिरवणूक हा एक धार्मिक कार्यक्रम आहे, या कार्यक्रमांशी लोकांच्या आस्था व श्रद्धात जोडलेल्या असल्यामुळे हा एक नाजूक विषय आहे. त्यामुळे प्रशासनाने हा विषय गांभीर्याने व संयमाने हाताळून, जनभावनेचा आदर राखून या यात्रेचे पावित्र्य कायम ठेवावे असे आवाहन आ. श्वेताताई महाले यांनी या बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना केले. याशिवाय नागरिकांनी व दर्शनार्थी यात्रेकरूंनी देखील प्रशासनाचे सर्व नियम पाळावे आणि मंदिर व्यवस्थापनाला सहकार्य करून या यात्रेचा लाभ घ्यावा अशी विनंती आमदार शेताते महाले यांनी सर्व श्रद्धाळूंना या प्रसंगी केली. यावेळी संस्थान अध्यक्ष राजा भाऊ खरात, गोपाल शेटे, पंडितराव देशमुख शहराध्यक्ष , ठाणेदार भूषण गावंडे, नगर परिषद मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे, महावितरणचे शहर अभियंता वाघ, भुसारी, सहायक गटविकास अधिकारी हिवाळे, निमावत, माजी नगराध्यक्ष सुहास शेटे, सचिन बोंद्रे, प्रा. वीरेंद्र वानखेडे, विजय नकवाल यांच्यासह संस्थेचे विश्वस्त उपस्थित होते.

 

0 9 3 7 4 1
Users Today : 22
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *