प्री -वेडींग फोटो शूट ला बंदी… दहिगावं गुरव समाज मंडळाचा नंदुरबार येथील कार्यक्रमात ऐतिहासिक निर्णय “

Khozmaster
1 Min Read

प्रविण चव्हाण नंदुरबार : – प्री-वेडिंग फोटोग्राफीची क्रेझ आजकाल मोठ्या प्रमाणात वाढते आहे. यामुळे पैशांच्या अपव्ययाबरोबरच काही गंभीर प्रश्नही समोर येत आहेत.याच पार्श्वभूमीवर पाश्चिमात्य पद्धतीने कपडे घालून वर वधूंच्या वैयक्तिक क्षणांचे फोटो काढणे, त्यांचे सार्वजनिक प्रदर्शन लग्न समारंभात मोठ्या डिजिटल परड्यावर करणे या गोष्टी अत्यंत चुकीच्या असून,त्यामुळे प्री-वेडिंग शूटिंग आणि त्याचे सार्वजनिक प्रक्षेपण टाळून याला यापुढे समाजाने नकार द्यावा असा निर्णय नंदुरबार जिल्ह्यातील गुरव समाजाने घेतला आहे. या निर्णयाचे सर्वस्तरातुन स्वागत होत आहे. याच बरोबर अन्य समाजाभिमुख निर्णय हि या वेळी घेण्यात आले आहेत.लग्न वेळेवर न लागणे व मुहूर्त टळून जाणे हि बाब नित्याची व अत्यंत गंभिर असून, याबाबत काळजी घेण्याचा निर्णय घेण्यात आला.नंदुरबार येथील इंदिरा गांधी कॉम्प्लेक्स मध्ये दोन दिवसीय दहिगाव गुरव समाजाच्या वार्षिक सर्वसाधारण सभा व विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित, शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी व इतर मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

 

0 9 3 7 4 2
Users Today : 23
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *