ढासळलेली कायदा व सूव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अवैद्य धंदे त्वरित बंद करा…

Khozmaster
3 Min Read

अन्यथा पोलीस अधीक्षक कार्यालयापुढे वरलीचे दुकान सुरू करू…अँड सतीशचंद्र रोठे.*

*अवैद्य धंदे, चोरी, लुटमार, खोटे गुन्हे दाखल होणे यामुळे जिल्ह्यात दहशत..*

बुलढाणा : ( खोज मास्टर ) अकील शाह /जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करण्यासाठी एक वर्षांपासून आझाद हिंदच्या माध्यमातून विविध आंदोलने करण्यात आली. परंतु अद्यापही अवैध धंदे बंद झालेले नसून उलट पक्षी त्यामध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था ढासाळली आहे. सर्वत्र दहशत आणि अराजकतेचे वातावरण निर्माण झाले आहे. स्वयं केंद्रित आणि राजकीय स्वार्थासाठी जातीय धार्मिक दंगली घडविण्याचा प्रयास काही तथाकथित लोक करीत आहे.त्यामुळे त्वरित अवैध धंद्यांना लगाम लावावे अन्यथा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर वरलीचे दुकान सुरू करण्यात येईल. असा इशारा आझाद हिंद च्या वतीने देण्यात आला आहे.कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांना जिल्हा वासीयांकडून मदतीची भावना राहिलेली आहे.आजपर्यंतचे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून स्वर्गीय दीपक जोग ,रनजीतकुमार सहाय तसेच सद्यस्थितीत मुंबई चे महापोलीस निरीक्षक कृष्णप्रकाश, नागपूरचे महा पोलीस निरीक्षक अमितेश कुमार, यवतमाळचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.भुजबळ पाटील ,वरिष्ठ पोलीस निरीक्षक बुलढाणा शहर चे ठाणेदार यु.के.जाधव, तांदळे, बांगर ह्या अधिकाऱ्यांनी बुलढाणा जिल्ह्याला दिलेली सेवा सदैव स्मरणीय आणि अभिमानास्पद आहे.कर्तव्यदक्ष कार्यतत्पर अधिकाऱ्यांसाठी जिल्ह्यातील सुज्ञ नागरिक, संघटना, पक्ष,पदाधिकारी, नेते सदैव सहकार्य करण्यास कार्यतत्पर आहेतच दुमत नाही. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी प्रथमता नियोजनबद्ध आराखडा महत्त्वपूर्ण आहे. प्रामुख्याने दरोडे,चोरी,लूटमार, खोटे गुन्हे नोंदविणे यावर प्रतिबंध लागावा. चोर सोडून संन्यासाला फाशी देण्याची प्रवृत्ती, वृत्ती थांबली पाहिजे. आपण शासनाचा म्हणजेच जनतेने दिलेल्या टॅक्स मधून पगार मिळवतो याची जाणीव कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांना असते. परंतु दुर्दैवाने काही अधिकाऱ्यांना अवैध धंद्यातून मिळणारी चिरीमिरी पगारापेक्षा अतिप्रिय राहते.वर्तमान परिस्थितीत जिल्ह्यातील प्रत्येक गल्ली बोळात शासन प्रशासनाच्या जागेत राजेरोसपने सुरू असलेले अवैध धंदे बंद करण्यासाठी बुलढाणा जिल्हा पोलीस दलाने कात टाकावी. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी ठरवल्यानंतर एका तासात जिल्ह्यातील धंदे बंद होऊ शकतात हा अनुभव जिल्हा वासियांनी घेतलेला आहे. त्यामुळे इतर कारणे न शोधता डायरेक्ट कृती करून जिल्हावासीयांचा विश्वास कमवावा. येणाऱ्या काळात विधानसभा,लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. त्यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होने घातक आहे.धार्मिक व जातीय दंगली घडल्यास त्यास जिल्हा पोलीस प्रशासनच जबाबदार राहील हे खेदाने या नमूद कराव लागत आहे. नुकताच मोताळा येथे घडलेला प्रकार सुनियोजित षडयंत्राचा भाग असल्याचा सुगावा पोलीस प्रशासनाकडे आहे. परंतु खऱ्या आरोपींना अटक करण्याची धमक फक्त कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांमध्ये असते. त्यामुळे सदरक्षणाय खलनिग्रह ब्रीद घेऊन कार्यरत असणाऱ्या पोलीस प्रशासनाने कर्तव्यदक्षतेची दक्षता घ्यावी. अन्यथा आझाद हिंद शेतकरी संघटनेने जाहीर केल्याप्रमाणे पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरच वरलीचे दुकान सुरू करण्यात येईल असा इशारा एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे आझाद हिंद शेतकरी संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष अँड सतीशचंद्र रोठे यांनी दिला आहे.

 

0 9 3 7 4 2
Users Today : 23
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *