वैजापुरात भगवान महावीर जयंती निमित्त,मॅरेथॉन स्पर्धा,बाईक रॅली, व सकल जैन एकता पदयात्रा

Khozmaster
1 Min Read

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत

वैजापूर ता,०४भगवान महावीरांनी इसवी सनापूर्वी ६५०च्या जवळपास दिलेले “जगा आणि जगू द्या”चे तत्व आज पायदळी तुडवून प्राणी मात्र व मनुष्य प्राण्यांचा जगण्याचा हक्क हिरावून घेतला जात आहे,या भूतलावरील प्राणिमात्रा,जीवजंतू,वनस्पती,पशु,पक्षी, माणूस या सर्वांना जगण्याचा हक्क आहे,मात्र आजचामानव हा विश्वातील सजीवांच्या जीवावर उठला आहे,विध्वंसक व विघातक वृत्ती धारण करून सर्वनाशाचा विचार आज मानवी मनात घुसला आहे,हा विघातक विचार मानवी मनातून समूळ काढण्यासाठीभगवान महावीरांचे तत्व”जगा आणि जगू द्या”हे प्रत्येकाच्या मन पटलावर बिंबविण्याची नितांत गरज आहे,असे वक्तव्य जेष्ठ नागरिक धोंडीरामसिंह राजपूतयानी मंगळवार(ता,,०४)रोजी भगवान महावीर जन्म कल्याणक निमित्त आयोजित कार्यक्रमात केले,या प्रसंगी नगराध्यक्ष शिल्पाताई परदेशी, विशाल शेठ संचेती,अखिल शेख, पंकज ठोंबरे,मेजर सुभाष संचेती, प्रकाश शेठ बोथरा,राजू संचेती,इंदर बोथरा,संतोषशेठ बोथरा, निखिल लुनावत,प्रफुल संचेती,प्रा,जवाहर कोठारी, ज्योति संचेती,ललिता बोरा,दर्शना लोढा,सपना संचेती,सुभाष बोथरा,श्री बागमार,यांची उपस्थिती होती,या कार्यक्रमात मॅरेथॉन विजेत्यांना, बाईक विजेत्यांना,उत्कृष्ट कला सादर केली त्यांना,तसेच नाटिका सादर केली त्याना बक्षिसे वितरित केलो ,सूत्र संचलन राजू संचेती यांनी केले, आभार -प्रकाश शेठ बोथरा यांनीमानले फोटो कॅप्शन-विशाल संचेती,धोंडीराम राजपूत ,निखिल लुनावत, संतोष बोथरा,रॅली ला ध्वज दाखविताना)

 

0 9 3 7 4 2
Users Today : 23
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *