सिंदखेडराजा मतदार संघात होणार हरितक्रांती –

Khozmaster
2 Min Read

डॉ.शशिकांत खेडेकर यांच्या प्रयत्नाला मोठे यश…!10 कोटि रू निधी मंजूर

देऊळगांव राजा प्रतिनिधी राजेश पंडित /राज्यात ज्याप्रमाणे सत्तांतराचे वारे वेगाने वाहले त्याचप्रमाणे सिंदखेड राजा मतदार संघात विकासाचा वेग जोरात वाहत आहे. मा.आ.डॉ.शशिकांत खेडेकर यांच्या माध्यमातून मातृतीर्थ सिंदखेडराजा विधानसभा मतदार संघात प्रत्येक आठवड्यात कोणत्या ना कोणत्या विभागामार्फत कोट्यवधी रुपयाचा विकास निधी मंजूर होत आहे. त्यामध्ये आणखी भर पडली असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब व उप मा.ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा व लोणार तालुक्यातील कोल्हापूरी बंधारे,द्वारयुक्त सिमेंट बंधारे आणि पाणी साठवण बंधारे यांसाठी सर्वाधिक 10 कोटीचा निधी मंजूर केला आहे. यासाठी मा.आ.डॉ.शशिकांत खेडेकर यांच्या प्रयत्नाने मिळवून दिले असून दुष्काळग्रस्तांसाठी ही पर्वणी ठरणार आहे.जलक्रांती आणि जलसंधारणेचे प्रणेते माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी विदर्भ दुष्काळमुक्त करण्यासाठी जलसंधारण विभागाची निर्मिती करून त्याला सक्षम केले.विदर्भातील बुलढाणा जिल्हा हा तसा दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो विशेषतः सिंदखेडराजा आणि देऊळगाव राजा लोणार हे तीन तालुके जिल्ह्यापासून दुरवर आणि पर्जन्यमानाच्या दृष्टीने दुष्काळी भाग आहे.2014 ते 2019 या काळात डॉ शशिकांत खेडेकर यांनी यापूर्वी हाती घेतलेल्या उपक्रमाअंतर्गत मतदार संघातील जनतेला मुबलक पाणी कसं मिळेल त्यांची शेती सिंचनाखाली कशी येईल यासाठी प्रयत्न केले त्यातुन दुर्लक्षित आणि दुरवरील सर्व नागरीक आणि शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करून त्यांच्या शेतीस मुबलक पाणी पुरवठा होण्याच्यादृष्टीने पाणी अडवा पाणी जिरवा या तत्त्वावर आधारीत बंधारे तयार करावे अशी चर्चा खासदार प्रतापराव जाधव यांच्या समवेत केली.त्यांनी ही ह्या कामी मदत करण्याचे आश्वासन दिले त्याप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी त्यांच्याकडे असलेल्या जलसंधारण विभागास, देऊळगाव राजा तालुक्यातील उंबरखेड, जांभोरा व लोणार तालुक्यातील बंधारे बांधण्यासाठी रू 10 कोटीचा निधी देण्याचे निर्देश दिले होते त्याप्रमाणे अखेर जलसंधारण विभागाने उपरोक्त 10 कोटीच्या विकासकामाना प्रशासकीय मान्यता दिली असून तसे शासन निर्णय जलसंधारण विभागाने निर्गमित केले आहे.या कामामुळे परिसरातील नागरिकांना पाणी टंचाई आणि दुष्काळमुक्त होण्यास मदत होणार असल्याने परिसरातील नागरिकांकडून डॉ शशिकांत खेडेकर यांच अभिनंदन करण्यात येत आहे.

 

माननीय

0 9 3 7 4 2
Users Today : 23
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *