सोयगाव तालुक्यातील स्थिती…..
सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत /तालुक्यात व सावळदबारा परिसरात :-एकेकाळी महत्वाची भूमिका बजावणा-या तंटामुक्त गाव मोहिमेला तालुक्यात घरघर लागली आहे. या समित्या नाममात्र राहिल्या असून गावातील भांडण तंटे आता फर्दापूर पोलीस ठाणे पर्यंत पोहचत आहेत. त्यामुळे शासनाकडून ठरवण्यात आलेल्या तंटामुक्त गाव मोहिम आता कागदपत्रावर राहिले आहे. शातंतेतकडून समृध्दीकडे नेणा-या महात्मा गांधी तंटामुक्त गाव गृहमंत्री कै.आर.आर. पाटील यांच्या संकल्पनेतून १५ ऑगस्ट २००७ रोजी करण्यात आला. तालुका प्रशासन , पोलीस प्रशासन , पोलीस पाटील ,गावातील सरपंच , गावातून निवडण्यात आलेले तंटामुक्त अध्यक्ष यांच्या माध्यमातून गावातील वाद , तंटे गावातच सोडविण्याची तरतूद यात आहे. वाद गावातच मिटत असल्यामुळे ही मोहीम अल्पावधीतच लोकप्रिय ठरली. आनखी विशेष बाब म्हणजे तंटामुक्त गावांसाठी पुरस्कार घोषित केल्याने गावातील नागरिक एकोप्याने राहू लागले. नागरिकांच्या एकजुटीमुळे गावागावा शांतता निर्माण व्हायला लागली . चांगली काम केल्याने अनेक पुरस्कारही मिळाले. शिरपूर तालुक्यात गेल्या काही वर्षापासून या मोहिमेचा प्राभाव कमी होत जाऊन कोरोना काळापासून ही मोहिम थंडावली आहे. याची कारणे वेगवेगळी आहेत. १५ ऑगस्ट हा या मोहिमेचा वर्धापन दिन असल्याचे खुद काही अधिका-यांनाही माहित नसल्याचे चित्र आहे. संबंधित विभागाकडून जनजागृती व्हावी अशी अपेक्षा असताना आता ते पण होत नाही. दरम्यान गावात वादविवाद वाढला तर तंटामुक्तीची आठवण व्हायची आणि गावातील वाद गावातच मिटवली जात होती. मात्र , आता गावातील भांडणे पोलीस ठाणे पर्यंत पोहचत आहेत. यामुळे शासनाच्या या मोहिमेला घरघर लागली असे म्हणण्यास हरकत नाही.अनेक वर्षापासून तेच अध्यक्ष…… जवळपास आठ ते दहा वर्षापासून समित्या त्याच आहेत. १५ ऑगस्ट रोजी ग्रामसभा घेऊन तंटामुक्त अध्यक्षांची निवड केली जाते. पण काही ठिकाणी ग्राससभा होतात तर काही ठिकाणी ग्रामसभा होतच नाहीत. काही ठिकाणी ग्रामसभा घेतली जात असली तरी तंटामुक्त अध्यक्षांचा विषयच येत नाही. चौकट…. ▪️पक्षपातीपणाचा देखील बसला फटका… “”गावातील छोटी – छोटी भांडणे , तंटे, वाद , तक्रार पोलीस स्टेशनला येत असतात. काही ठिकाणी राजकारण तर काही ठिकाणी तंटामुक्ती अध्यक्ष यांचे गाव पातळीवरील असणारी पक्षपाती वागणूक यामुळे समितीचा प्रभाव कमी झाला. लोकांना पोलीस स्टेशनच बरे वाटत आहे.प्रा.जीवन कोलते पाटील सामाजिक कार्यकर्ते सावळदबारा ता सोयगाव
Users Today : 23