सिंदखेडराजा सुरेश हुसे /तालुक्यातील जऊळका ताडशिवनी पिंपळगाव कुडा शिवारातील खडकपूर्णा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध रेती वाहतूक व उत्खनन मोठ्या प्रमाणात होत होते या रेतीची वाहतूक व चोरी रोखण्यात अपयशी ठरल्याने तलाठी प्रवीण जिने यांना उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे यांनी चौकशी अंती निलंबित केले याबाबत सविस्तर वृत्त असे की ज्ऊळका ताडशिवनी पिंपळगाव कुडा खैरव गावच्या गावचा कारभार तलाठी प्रवीण जिने यांच्याकडे सोपविण्यात आला होता त्या ठिकाणच्या नदीपात्र मोठ्या प्रमाणात रेतीची अवैध वाहतूक होत असल्याच्या तक्रारी तहसीलदार साहेब यांच्या कार्यालयात नागरिकांनी केल्या होत्या या तक्रारीची दखल घेत तहसीलदार सुनील सावंत यांनी तलाठी झिने यांना कारणे दाखवा नोटीस बजावली मात्र त्यांनी समाधानकारक उत्तर न दिल्याने त्यांचा अहवाल उपविभागीय अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आला. या अहवालावर ए़स डॉ ओ साहेब यांनी चौकशी चौकशी करून तलाठी प्रवीण झिने यांना निलंबित केले असून निलंबन काळात त्यांना देऊळगावराजा च्या तहसील कार्यालय ही मुख्यालय देण्यात आले आहे
Users Today : 23