छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
वैजापूर तl रक्तदान श्रेष्ठ दान,”दानात दान श्रेष्ठ दान चला करू या “रक्तदान,””रक्तदान काळाची गरज-जीव वाचवीते लोकांचे खरच” अशा घोष वाक्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत ,व देशाला रक्ताची गरज लक्षात घेत वैजापूर च्या युवकांनी पुढे येते,भगवान महावीर जन्म कल्याणक दिनी मंगळवार(ता,०४)रोजी मोठ्या संख्येने रस्क्तदान करून सामाजिक दायित्व पार पाडले ,या युवकांचे अभिनंदन करून याचे अनुकरण करून देशातील युवकांनी रक्तदान करण्यात पुढाकार घ्यावा व सामाजिक बांधिलकी जपावी असे आवाहन से,नि, शिक्षणाधिकारी धोंडिरामसिंह राजपूत यांनी केले ,त्यांच्या हस्ते रक्तदात्यांना कृतज्ञता प्रमाणपत्र वाटप करण्यात आले,युवक सर्वश्री विशाल संचेती,मोहित संचेती, शुभम शहा,निखिल बाफना,आकाश संचेती,निखिल लुनावत,सौरभ संचेतीआयुष्य संचेती, अभिषेक कोठारी,रोशन कोठारी, शुभम सुरेश संचेती, धीरज बोथरा,रोहित संचेती,श्री व सौ ,सुनंदीलाल बोथरा,नांदूशेठ,यांनी व ईतर युवक-,युवतींनी रक्तदान करण्यात पुढाकार घेतला,या प्रसंगी प्रकाश शेठ बोथरा,डॉ,संतोष गंगवाल, प्रा,जवाहर कोठारी,निलेश पारख,जैन पाठशाला शिक्षक राजेंद्र संचेती,संतोषी भालेराव,दर्शना लोढा,श्रीमती ज्योती संचेती, ललिता बोरा,साक्षी मुगदिया,अतुल बोथरा,संतोष शेठ बोथरा यांनी सहभाग नोंदविला,छत्रपती संभाजीनगर येथील लोकमान्य ब्लड बँक च्या वैद्यकीय पथकाने रक्त संकलन केले.
Users Today : 23