देऊळघाट येथे पिण्याच्या पाण्यासाठी संतप्त नागरिकांचा रास्ता रोको. विहिरीत पडून ८ वर्षे चिमुकलीचा मृत्यू . पाणीटंचाईचा बळी.

Khozmaster
1 Min Read

बुलढाणा चिखली (मन्सूर शहा)…जिल्ह्यात त पाणीटंचाईची ८ वर्षे मुलगी बळी ठरली असून. संतप्त नागरिकांनी तीव स्वरूपात रास्ता रोको आंदोलन केल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. याबाबत प्राप्त माहिती अशी की बुलढाणा तालुक्यातील देऊळघाट या गावात पाणीपुरवठा करण्यासाठी येळगाव धरणातून पूरक नळ योजना टाकलेली आहे. या नळ योजनेच्या माध्यमाने गावातिल अनेक ठिकाणी नळ उभारलेले आहे व त्यातून लोक पाणी घेत होते .परंतु देऊळघाट ग्रामपंचायचा मनमानी कारभार करत ही नळ योजना बंद पाडली आहे त्यामुळे लोकांना पाणी मिळत नसल्याने भटकंती तसेच विकत पाणी घ्यावे लागत आहे काळ ४ एप्रिल ला आठ वर्षीय अंजली भरत शेजोल ही मुलगी गावातील धनगर वाड्यात असलेल्या विहिरीवर पाणी घेण्यासाठी गेली असता तिचा तोल जाऊन ती विहिरीत पडली. तिला डोक्याला गंभीर मार लागल्याने बुलढाणा येथील सामान्य रुग्णालय दाखल केले व नंतर औरंगाबाद येथे हलवण्यात आले असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे एका लहान मुलीला आपला जीव गमावा लागला असा . आरोप करत संतत नागरिकांनी आज ५ एप्रिल ला दुपारी तीनच्या सुमारास देऊळघाटच्या बस स्टैंड वरील तीर्व स्वरूपाचे रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे तोपर्यंत देऊळ घातला कायमस्वरूपी पाणी मिळत नाही. तोपर्यंत माघार घेणार नाही अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे. अधिकाऱ्यांनी देखील देऊळघाट कडे धाव घेऊन आंदोलन कर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न सुरू केला आहे..

 

0 9 3 7 4 2
Users Today : 23
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *