समता पर्वात शुक्रवारी आरोग्य शिबिराचे आयोजन

Khozmaster
1 Min Read

बुलडाणा, दि. 5 : सामाजिक न्याय विभागाच्या समता पर्वात जागतिक आरोग्य दिनानिमित्त शुक्रवार, दि. 7 एप्रिल रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यातील ऊसतोड कामगार आणि जिल्ह्यातील तृतीयपंथी यांच्यासाठी दि. 25 एप्रिल रोजी आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. ही तपासणी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयात सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यत करण्यात येणार आहे.सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयातर्फे संपूर्ण एप्रिल महिन्यात समता पर्व अभियानांतर्गत विभागाच्या विविध योजना थेट जनतेपर्यंत संवाद साधून पोहोचविण्यात येत आहे. यासाठी जिल्हा, तालुका आणि ग्रामपातळीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.सदर आरोग्य तपासणीचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन समाजकल्याण सहाय्यक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी केले आहे.

 

0 9 3 7 4 2
Users Today : 23
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *