वडोद तांगडा येथील डीजे व दारूबंदीचा आदर्ष इतर गावक-यांनी घ्यावा – अॅड.वृषालीताई बोंद्रे

Khozmaster
3 Min Read

सरपंच व ग्राप सदस्यांचे कौतुक करून केला सत्कार 

  चिखली/बुलडाणा: दारू या व्यसनामुळे परीवारात हिंसाचार, भांडण तंटे आणि आत्महत्या सारख्या घटना वाढत आहेत या समस्येला आळा घालण्याकरीता जालना जिल्हयातील भोकरदन तालुक्यातील वडोद तांगडा या गावातील ग्रामस्थांनी केलेले प्रयत्न वाख्यान्याजोगे आहे येथील महिला संरपचाच्या पुढाकाराने तसेच गावक-यांच्या सहकार्याने दारू आणि समारंभ प्रसंगी वाजविण्यात येणा-या डी.जे. वर बंदीचा निर्णय घेतला आहे. सरपंच व गावक-यांनी घेतलेला निर्णय समाज हिताचा असुन या गावाचा आदर्ष इतरांनी घ्यावा असे आवाहन हिरकणी महिला प्रतिष्ठाणच्या संस्थापक अध्यक्षा अॅड.सौ. वृषालीताई बोंद्रे यांनी केले. यावेळी हा निर्णय घेवून त्याची अंमलबजावणी करणा-या महिला सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा त्यांनी सत्कार करून गौरव केला.जालना जिल्हा भोकरदन तालुक्यातील वडोद तांगडा या गावी एका विवाह समारंभ प्रसंगी हिरकणी महिला प्रतिष्ठाणच्या अध्यक्षा अॅड.सौ. वृषालीताई बोंद्रे हयानी दिनांक 04 एप्रिल रोजी उपस्थिती लावली होती. योवळी गावात विवाह समारंभ असतांना सुध्दा ऐवढी शातंता कषी काय ? असा प्रष्न त्यांनी कुतूहलाने उपस्थित ग्रामस्थांना केला. त्यावेळी गावकरी ते राव ना करी या म्हणीचा प्रत्यय नारी शक्तीच्या माध्यमातुन कसा सार्थकी लागुन गावाचे रूपांतर नंदनवनात झाल्याचे अनुभवयास मिळाले. हिरकणी प्रतिष्ठाणच्या माध्यमातुन गेल्या अनेक वर्षापासुन दारूबंदी व्हावी ही व्यसनमुक्तीची चळवळ त्या स्वतः चिखली विधानसभा मतदार संघात राबवित असुन सुरूवातीला जवळपास 60 गांवामध्ये यषही प्राप्त झाले होते. व्यसनमुक्ती करीता येथील महिला सरपंच सौ. मनिषाताई वासकर व त्यांच्या सहकारी यांनी कुठल्याही समारंभ प्रसंगी डिजे वादयवृदांच्या तालावर मद्यधुंद होवुन थिरकणारी तरूणाई दारू व्यसनाच्या आहेरी गेल्यामुळे अनेकांचे संसार उद्वस्त झाल्याची उदाहरणे आहेत. ही विदारक परिस्थीती गावक-याच्या पदरी नको म्हणुन त्यांनी गावात दारूबंदी बरोबरच डि.जे. बंदीचा निर्णय ग्रामस्थांच्या लोकसहभागातुन लागु केला आणि त्यात त्यांना यषही प्राप्त होत आहे या कार्याचे कौतुक करीत अॅड.सौ. वृषालीताई बोंद्रे यांनी महिला सरपंच सौ. मनिषाताई वासकर, उपसरपंच नाना पाटील तांगडे, सदस्य कोैतीक तांगडे, शांतीनाथ बराटे, अष्यपाक बागवान, विनोद तांगडे, विजु तांगडे, रामेष्वर तांगडे आदिंचा सत्कार केला.ज्या गावांमध्ये दारूबंदी झाली त्या गावांचा विकासही झपाटयाने होतो असे सांगुन अॅड. वृषालीताई बोंद्रे पुढे म्हणाल्या विवाह व इतर समारंभ प्रसंगी लावण्यात येणारे डी.जे. ही अत्यंत खर्चीक बाब असुन ब-याचदा वधु पक्षाची परिस्थीती नसतांनाही त्यांना पदरमोड करून हा डीजे लावावाच लागतो. आपल्या वडोद तांगडा या गावाने सरपंच सौ. मनिषाताई यांनी घेतलेल्या निर्णयाला गावक-यांची समर्थ साथ लाभल्याने हा निर्णय यषस्वी होत असल्याचा मी सुध्दा दारूबंदी करीता कार्यरत असल्याने मलाही मनस्वी आनंद होत आहे. दारूबंदी मुळे अनेकांचे संसार उद्वस्त होण्यापासुन वाचतात तर डि.जे बंदीमुळे तरूणाईवर चांगले संस्कार केल्या जातात. संस्कारी तरूण स्वतःचे व गावाचे त्याचबरोबर देषाचे भविष्य घडीत असल्याचे अनेक उद्हारणे आहे असे सांगुन या गावाचा आदर्ष इतरांनी घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी अॅड.वृषालीताई बोंद्रे यांच्या समवेत चिखली तालुका महिला कॉग्रेसच्या अध्यक्षा सौ. संगिताताई गाडेकर, इरला गावचे सरपंच मोहन खंडागळे,विजु पाटील, माजी सरपंच सुधाकर खंडागळे, साहेबराव जवंजाळ,गणेष वाघ, विðल म्हस्के, तुकाराम खंडागळे, विनोद गायकवाड यांची उपस्थिती होती.

0 9 3 7 4 2
Users Today : 23
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *