तालुका प्रतिनिधी दत्ता हांडे देऊळगाव राजा/दि 04/04/2023 रोजी सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील कुंभेफळ,देऊळगाव कोळ, मलकापूर पांगरा ,आगेफळ, आंबेवाडी, झोटिंगा, येथे खासदार प्रतापरावजी जाधव साहेब व माजी आमदार डॉ शशिकांतजी खेडेकर साहेब यांनी आणलेल्या विकास कामांमुळे प्रत्येक गावातील गावकऱ्यांनी दोन्ही नेत्यांचे जंगी स्वागत व नागरी सत्कार केला माजी आमदार खेडेकर साहेबांचा मतदारसंघासाठी असलेला विकासाचा दृष्टिकोन व खासदार जाधव साहेबांचे त्यांना मार्गदर्शन यामुळे एका माजी आमदारांनी मागील 8 महिन्यात सिंदखेडराजा मतदार संघासाठी 250 कोटीचा निधी आणला, यासाठी या दोन्ही नेत्यांचे व मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.या कार्यक्रमांसाठी प्रमुख उपस्थिती म्हणून मेहेकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजयजी रायमुलकर साहेब युवासेना जिल्हाप्रमुख ऋषी जाधव युवासेना जिल्हा सरचिटणीस श्रीनिवास खेडेकर शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाबुरावजी मोरे ,तालुकाप्रमुख वैभव देशमुख, जी एस देशमुख, शिवा ठाकरे, योगेश जाधव, अतिश तायडे, संदीप मगर, राहुल काबरा ,अशोक कायंदे, बबन जायभाय, प्रवीण गीते, नरेंद्र दिघोळे, रवि वायाळ, अविदास बंगाळे, शुभम पावरे, निखिल दिघोळे, गोपी काळे, करण काळे व गावातील शिवसेनिक युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
Users Today : 23