45 वर्षानंतर त्या वर्ग मित्र आणि मैत्रिणींनी भरवली शाळा ———-

Khozmaster
3 Min Read

अनेक मित्र व मैत्रिण 1978 नंतर भेटताच दिला गेला जुन्या आठवणींना उजाळा)

देऊळगाव राजा प्रतिनिधि राजेश पंडित ता.06/04/2023) देऊळगाव राजा हायस्कूल देऊळगाव राजा मध्ये 1978 ला दहावित शिक्षण घेतलेल्या 62 मित्र आणि मैत्रिणींनी 45 वर्षानंतर गेट टुगेदर करत शहरात दिनांक 2 एप्रिल रोजी एकत्रीत येत त्या काळच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला तर अनेक मित्र आणि मैत्रिणींनी आमने सामने येताच त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू निघाले हा क्षण खरोखरच पाहण्यासारखा व स्मरणात राहण्यासारखा होता,याबाबत सविस्तर असे की देऊळगाव राजा शहरातील देऊळगाव राजा हायस्कूल देऊळगाव राजा या शाळेत सन 1977/78 मध्ये दहावित शिक्षण घेतलेल्या मित्र आणि मैत्रिणींनी गेट टुगेदर करण्याचा निर्णय घेतला व वर्गातील विवेक खेडेकर, संजय डोनगावकर, धर्मराज हनुमंते, सेवा निवृत्त उप विभागीय अभियंता रवी शर्मा, सुनिल सराफ, नंदा पन्नालाल डोनगावकर, यांनी एकत्र येत वर्ग मित्र या नावाने व्हॉट्स ॲप ग्रूप तयार करून सर्वांचे नंबर शोधण्याचा प्रयत्न केला,120 वर्ग मित्रांपैकी 85 मित्रांचे मोबाइल नंबर शोधण्यात यश मिळाले त्यांचे सोबत चर्चा सुरू झाली व गेट टुगेदर ची 2 एप्रिल तारीख निश्चित करण्यात आली,सकाळी 9 वाजता 85 पैकी 62 मित्र आणि मैत्रिणी एकत्र जमा झाले,सर्वांनी ग्राम दैवत श्री बालाजी महाराज यांचे मंदीरात जाऊन श्रींचे दर्शन घेतले व ज्या शाळेत 45 वर्षांपूर्वी 10 चे शिक्षण पुर्ण केले त्या शाळेत जाऊन त्यावेळचे शिक्षक वृंद मुरलीधर बैरागी, एन.टी.कुळकर्णी, मुकुंदराव डोईफोडे, अनिल वाजपे, यांना मान सन्मानाने शाळेत आणून त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला, व त्याकाळी जशी प्रार्थना होत होती तशीच प्रार्थना करण्यात आली नंतर ज्या वर्गात शिक्षण घेतले त्या वर्गात जाऊन आपआपल्या बेंचवर जाऊन बसले व 45 वर्षापूर्वीचा आनंद घेतला, व जुन्या आठवणींना उजाळा देत चर्चा करण्यात आली तर अनेक मित्र आणि मैत्रिणी 45 वर्षानंतर आमने सामने येताच अनेकांनी एकमेकांना ओळखले नाही मात्र ज्यांनी ज्यांनी एकमेकांना ओळखले त्यांच्या डोळ्यातून आनंदआश्रु निघू लागले हा क्षण खरोखरच पाह न्यासारखा होता व स्मरणात राहील असाच होता,दिवसभर या वर्ग मित्र आणि मैत्रिणींनी एकमेकांच्या सहवासात राहत जसे काही आपण आजही दहावितच आहोत असे वावरतांना दिसुन आले, त्याच शाळेच्या मुख्य प्रवेश द्वाराजवल सर्वांनी एकत्रित येत सर्वांच्या परिवारास कायम स्वरुपी स्मरणात राहील असा ग्रूप फोटो काढण्यात आला व त्या फोटोची प्रिंट सर्वांना देण्यात आली, दिवसभर विवीध सांस्कृतीक कार्यक्रम घेऊन आनंद साजरा करण्यात आला यावेळी वर्ग मित्र विवेक खेडेकर यांची मुलगी रेणू हिने बहारदार मंच संचलन केले,राष्ट्रगीताने गेट टुगेदर ची सांगता करण्यात आली,

 

0 9 3 7 4 2
Users Today : 0
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *