मेहकर :–अनेक वर्षांपासून अनुसूचित जाती जमातीच्या लोकांनी आपली उपजीविका चालवण्यासाठी शासकीय ईक्लास जमीनीवर शेती उपयोगी अतिक्रमण करून ते आपली उपजीविका चालवत आहे . आतापर्यंत शासनाच्या नाकर्तेपणामुळे व आडमुठी धोरणामुळे हा गरीब भुमीहीन दारेद्र्यरेशेखालील लोकांचा प्रश्न सोडवण्यात सरकारला अपयश आले आहे . सरकार हे गरीबांचे नसुन ते धनदांडग्याचे सरकार आहे का असा प्रश्नही समता संघटनेचे अध्यक्ष नितीन गवई यांनी उपस्थित केला आहे.अनुसुचीत जाती जमातीच्या लोकांकडे उपजीविका चालवण्यासाठी इतर कोणतेही साधन नसल्यमुळे शासकीय गायरान जमीनच त्यांच एकमेव जिवन जगण्याच साधन आसुन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी गायरान जमीनी नावावर करणार असल्याचे घोषना केल्याने त्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे . मुख्यमंत्र्यांनी केलेली घोषणा ही तात्काळ आमलात आणुन त्यावर शासनाने लवकर नव्याने शासन निर्णय जाहीर करावा असा आशावाद समता संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आम्रपाल भाऊ वाघमारे यांनी सरकारकडे व्यक्त केला आहे .या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी होण्यासाठी काल मेहकर तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना समता संघटना व आॅल इंडिया पॅन्थर सेना जिल्हकार्यध्यक्ष यांच्या बिनशर्त पाठिंब्याचे निवेदन देण्यात आले आहे .शिंदे सरकारने भुमिहीनाच्या प्रती दाखवलेली सद्भावना लवकर अमलात आनावी अशी अपेक्षा पॅन्थरचे कार्याध्यक्ष विनोद जाधव यांनी बोलताना व्यक्त केली आहे. गायरान कसणाऱ्या शेतकऱ्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्याय आले यावेळी समता संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय दोडे मेहकर तालुकाध्यक्ष भिमराव काकडे गैतम क्षिरसागर वायसे ता उपाध्यक्ष गणेश इंगळे मोताळा ता अध्यक्ष आवच्यार बाबा अरुण भालेराव वसुदेव निकाळजे शिध्दोधन गवई पि के.शेजोळ आमोल गवई व महीला व बहुसंख्य पुरूष हजर होते .
Users Today : 0