चिखली कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत एकूण २४२ उमेदवारी अर्ज पैकी २५ उमेदवारांचे अर्ज नामंजूर .

Khozmaster
3 Min Read

चिखली दै. खोज मास्टर न्यूज (मन्सूर शहा).

चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सन.२०२३ या होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये ५ एप्रिल २०२३ रोजी छाननी प्रक्रियेदरम्यान 11 माजी संचालकावर बाजार समितीचे निधीचा दुरुपयोग प्रकरणी . आक्षेप. नोंदवून निवडणूक अर्ज बाद करण्याची मागणी कैलास हिरा राम शर्मा यांच्यामार्फत करण्यात आल्याची वार्ता समोर आली. आहे बाजार समितीचे सन.२०१५-१६ चे अंकेक्षण अहवालाची छाननी केल्यानंतर त्यामधील निर्देशनात आलेले मुद्दे याबाबत महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री विकास व अधिनियम( अधिनियम १९६३ चे कलम ४०ब )अन्वये चौकशी होणे आवश्यक असल्यामुळे दोन सदस्य चौकशी समिती नेमण्यात आली होती. याबाबत प्राप्तवृत्त असे की माहितीनुसार सन २०१७ रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे तत्कालीन संचालकविरुद्ध तक्रार दात्यांनी जिल्हा निबंधकाकडे . रीतसर १९ मुद्द्याबाबत तक्रार देऊन बाजार. समितीच्या भ्रष्टाचाराची व बाजार समितीच्या निधीचे दुरुपयोग केल्याचे तक्रारीत म्हटले होते. त्या अनुषंगाने या तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हा उपनिबंधक अधिकारी यांनी सह. सहनिबंधक जळगाव जामोद आर टी अंभोरे व लेखा परीक्षक नांद्रे यांना ४० ब कलमानुसार चौकशी करण्याचे आदेश दिले होते .यात निष्क्रिय नामधारी परवाने धारकांचे परवाने रद्द केले नाही देणगी देण्याचे नावाखाली सरळ असते मनमानी त्याचप्रमाणे देणगीचे वाटप नियमित व दैनंदिन . आय डी बी आय बँकेचे नियमित कर्ज न भरता बाजार समितीच्या निधीची मनमानी उधळपट्टी केली. व बँकेकडे नाममात्र निधी हप्त्यापोटी भरणा केला परिणामी बाजार समितीला बँकेच्या दंडाचा व अधिक व्याजाचा उदंड सहन करावा लागला जाहिराती हार्दिक अभिनंदन दिवाळी शुभेच्छा जयंती व नेत्यांचे वाढदिवस प्रसिद्धी हा सर्व खर्च सहकार आयुक्त व निबंधक सह संस्था म.रा. परिपत्रक २/२/२००० नुसार समितीच्या संबंधाच्या व्यतिरिक्त दिलेल्या सर्व जाहिराती व खर्च हा बेकायदेशीर असून आयुक्तांच्या आदेशाची पूर्तता करण्यात आली नाही भेटी व समारंभ ,७,४७,६८३ रुपये इतका खर्च केला आहे. बाजार समिती कर्जबाजारी असताना सदरील खर्च हा बहुतांशी फराळ जेवण चहापाणी विचार डेकोरेशन फोटो लॉजिंग मंडप इत्यादी कारणाने खर्च केलेला आहे तसेच संचालकांनी आपल्या पदाचा दुरुपयोग केल्याचा १९ मुद्द्याची चौकशी होऊन दिनांक ३ एप्रिल २०२३ रोजी जिल्हा खूप निबंधक यांनी महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री विकास व अधिनियम १९६३ चे कलम ५३ आणि बाजार समितीचे तात्कालीन सचिव व संचालक मंडळ यांनी समितीची निधीचा दुरुपयोग केल्याबरकांनी जबाबदार ठरवीत पारित केले असून यात बाजार समितीचे सचिवासह १७ माजी संचालकांना जबाबदार धरण्यात आले असून . तसेच कैलास हिरा राम शर्मा यांनी आक्षेप घेतलेल्या ११ माजी संचालकाची अर्ज नामंजूर करण्यात आली आहे.. असे बाजार समितीचे निधीचा गैरवापर केल्याप्रकरणी सचिव १७ माजी संचालक यांचे अर्ज नामंजूर तर ११ माजी संचालक यांचे . असे एकूण २४२ पैकी २५ उमेदवाराचे अर्ज नामंजूर करण्यात आले आहे.

 

0 9 3 7 4 2
Users Today : 0
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *