जालिंदर बुधवतांसह सात जणांचे अर्ज फेटाळ

Khozmaster
1 Min Read

बुलढाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत ठाकरे गटाला हादरा

बुलडाणा : ( खोज मास्टर ) अकील शाह/ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांना अजून वेळ आहे. परंतु त्यापूर्वीच निवडणूक मैदानातून ठाकरे गटाच्या उमेदवारांना बाद करण्याचे प्रयत्न शिंदे गट आणि भाजपाने सुरू केले असून त्यात ते यशस्वी झाल्याचे दिसून येत आहे. ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांचा उमेदवारी अर्ज आज फेटाळण्यात आला. त्यांच्यासह सात जणांची उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी शिंदे गटाच्या आक्षेपावर फेटाळून लावले आहेत. बुधवत यांच्याकडे व्यापारी अडत्याचं लायसन्स आहे आणि त्यांनी सहकारी सोसायटी कडून अर्ज भरला आहे. व्यापारी अडत्यांच्या मतदार यादीत नाव असल्यामुळे बुधवत यांना शेतकऱ्यांसाठी असलेल्या सहकारी संस्थेकडून निवडणूक लढता येत नाही. हे अधिनियमात बसत नसल्यामुळे बुधवत यांचा अर्ज फेटाळण्यात यावा अशी तक्रार ओमसिंग राजपूत, श्रीकांत पवार, धनंजय बारोटे, ऍडव्होकेट सुनील देशमुख, ऍडव्होकेट मोहन पवार आणि संदीप उगले यांनी केली होती.या तक्रारीनंतर निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जालिंदर बुधवत यांचा उमेदवारी अर्ज आज फेटाळला. बुधवतांसह राजू फकीरबा मुळे, सुधाकर एकनाथ आघाव, सुनील अशोक गवते, नंदाबाई हरिभाऊ सिनकर, ज्ञानदेव भीमराव साळवे आणि रखमाबाई अजबराव पिंपळे यांचा उमेदवारी अर्ज वरील कारणामुळे बाद करण्यात आला आहे. जालिंदर बुधवत यांनी सदर निर्णयाविरुद्ध जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे अपील करणार आहेत.

 

0 9 3 7 4 2
Users Today : 0
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *