इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी /शेगाव येथून जवळच असलेल्या गौलखेड येथे हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सवानिमित्त हरिपाठ सप्ताह राम कथेचे आयोजन करण्यात आले होते. आज सहा एप्रिल रोजी गुरुवारी काकणवाडा तालुका खामगाव येथील प्रख्यात कीर्तनकार ह भ प विष्णू महाराज आढाव यांच्या मधुर वाणी मध्ये सकाळी 9 ते 12 वाजे दरम्यान काल्याचे किर्तन झाले. यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी व हनुमान जी ची महा आरती करण्यात आली मागील आठ दिवसापासून हनुमान मंदिर गोलखेड येथे सुरू असलेल्या श्री राम कथा व हरिपाठ सप्ताहाचा समारोप करण्यात आला. यानिमित्त आयोजित भंडाऱ्यामध्ये पंचक्रोशीतील गावासह गौलखेड गावातील शेकडो भाविकांनी महाप्रसादामध्ये सहभागी होऊन भंडाऱ्याचे प्रसाद ग्रहण केले. हा धार्मिक सोहळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी गौलखेड येथील गावकऱ्यांचा पंचक्रोशीतील हरिपाठ भजन मंडळ व टाळकरी भजन मंडळाचे सदस्य व गावकऱ्यांनी सहकार्य केले
Users Today : 0