हिंदूंच्या राष्ट्र संतांवर टीका करणारे हिंदूद्वेष्टे समाजविघातक. प्रबोधनकार अँड. रोठे.
मोताळा /राष्ट्रसंत तुकोबां आणि साईबाबांना जाणीवपूर्वक कमी लेखणारे बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री हिंदूंची अवलाद कशी असू शकता..? हे तर मिश्रित हिंदूचे लक्षन असून हिंदू धर्मियांमध्येच फूट पाडण्याचे राजकीय षडयंत्र आहे .हिंदू धर्मियांनी मुलींचे शिक्षण आणि धर्माचे रक्षण करण्यासाठी एकसंघ व्हावे. अन्यथा येणाऱ्या काळात हिंदू धर्माच्या नावावर हिंदूंचेच शोषण करणाऱ्यांची अवलाद लचके तोडल्याशिवाय राहणार नाही. असे प्रखर मत प्रबोधनकार अँड सतीशचंद्र रोठे यांनी व्यक्त केले.तालुक्यातील कोल्ही गवळी येथील आझाद हिंद महिला संघटना,राष्ट्रमाता जिजाऊ भजनी मंडळ व महाबळेश्वर संस्थांनच्या संयुक्त विद्यमानाने बजरंगबली जन्मोत्सव तसेच महाबळेश्वर उत्सवाच्या अनुषंगाने समाज प्रबोधनकार अँड सतीशचंद्र रोठे यांचे हिंदू धर्म संस्कार आणि संस्कृती या विषयावर समाज प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन सहा एप्रिल रोजी सकाळी करण्यात आले होते. यावेळी त्यांनी उपरोक्त मत व्यक्त केले. श्रीक्षेत्र महाबळेश्वर संस्थांचे अध्यक्ष जगदेवराव शिंदे, सचिव देवराज शिंदे,पुरुषोत्तम शिंदे,आझाद हिंदचे प्रदेश सोशल मीडिया इन्चार्ज योगेश कोकाटे यासह पारायण समितीचे सुरेश राजमल पाटील, वसंता पाटील, गजानन मुंदोकार, बाळू शिंदे, कथा वाचक हभप पंजाबराव महाराज सारोळा मारोती, कीर्तनकार हभप मयूर महाराज मनूर यांची प्रमुख उपस्थिती होती.सर्वप्रथम श्री महाबळेश्वर भगवंताचे पूजन, राष्ट्रसंत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला माल्यार्पन करून प्रबोधनपर कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.हिंदू धर्म संस्कार संस्कृती विषयावर मार्गदर्शन करतांना प्रबोधनकार अँड रोठेंनी आपल्या खास शैलीत समाजातील वास्तविकता, दाहकता, यावर रोखठोक प्रहार केले. तर समाज प्रबोधनाच्या माध्यमातून हिंदूंचेच लचके तोडणाऱ्या हिंदूद्वेष्टया हिंदूंनपासून सावध राहन्याचे जाहीर आवाहनही केले. कार्यक्रमाला तालुक्यासह जिल्ह्यातील बहुसंख्य भाविक भक्त, महिला आणि नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.प्रबोधनपर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनोज बोराडे, सुभाष प्रधान,कौतिक बोराडे,गणेश शिंदे, गणेश बोराडे, देवानंद बोराडे, रोशन शिंदे यांसह समस्त गावकऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. महाआरती, महाप्रसाद, पसायदान आणि राष्ट्रगीताने सांगता करण्यात आली.
Users Today : 1