डॉ.खेडेकर यांच्या प्रयत्नाने 75 हजार रुपयांची मदत
देऊळगाव राजा प्रतिनिधी राजेश पंडित /तालुक्यातील पिंपळनेर येथील शिवराम तुकाराम कुडके यांचा काही दिवसापूर्वी अपघात झाला होता घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे उपचाराचा खर्च कुडके कुटुंबाला झेपावत नव्हता त्यामुळे कुडके कुटुंबियांनी सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे मा.आ.डॉ.शशिकांत खेडेकर यांच्याशी संपर्क साधला व मदत करण्याची विनंती केली असता तात्काळ सर्व कागपत्रांची पूर्तता करून प्रस्ताव सादर केला व शिवराम कुडके यांच्या उपचारार्थ महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशाने व मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख मंगेशजी चिवटे यांच्या सहकार्याने तसेच मा.आ.डॉ.शशिकांत खेडेकर साहेब यांच्या प्रयत्नाने मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी अंतर्गत 75000/- रू मदत करण्यात आली आहेशिवराम च्या पुढील उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी स्व:त मुख्यमंत्र्याकडे डॉ.शशिकांत खेडेकर यांनी पत्रव्यवहार करुन मागणी केली, सर्व परिस्थीती व आजाराबाबत गांभीर्य ओळखून शिवराम पुढील उपचारासाठी तात्काळ 75 हजाराची मदत करण्याची मागणी केली व लगेच मुख्यमंत्री कार्यालयातून सूत्र हलली आणि लगेच मुख्यमंत्री सहायता निधी मधून देण्यात आली. सध्या शिवराम वर छत्रपती संभाजीनगर येथे उपचार चालु आहेत. डॉ.शशिकांत खेडेकर यांनी सदैव मतदार संघातील जनतेच्या अडीअडचणी प्रश्नांना प्राधान्य दिले आहे . डॉ शशिकांत खेडेकर यांनी 2014 ते 2019 च्या काळात मतदार संघातील अनेक रुग्णांना मदत करत रुग्णाचे प्राण वाचविले आहेत.
Users Today : 1