चिखली (मन्सूर शहा.)..सोम. दि.१० एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा जयस्तंभ चौक चिखली येथे मशाल आंदोलन होणार आहे. हुकूमशाही पद्धतीने राज्यकारभार करून देशाशी, सामान्य जनतेची संपत्ती काही धन दांडगे व्यापारांच्या हवाली करणाऱ्या महागाईचा भस्मासुर माजवत जनतेचे जगणे मुश्किल करणाऱ्या संविधानाने दिलेल्या लोकशाहीची गलचेपी करणाऱ्या सरकार विरोधात चिखली काँग्रेस तथा महा विकास आघाडी चे मशाल आंदोलन होणार आहे.
Users Today : 2