हरिभाऊ काकडे ता प्रतिनिधी मेहकर /तालुक्यात देशी -विदेशी दारूची राजरोसपणे ढाबे हॉटेलवर विक्री सुरू असून मेहकर पोलीस याकडे नाममात्र कार्यवाही करत आहेत परंतु ज्यांच्यावर कार्यवाही करण्याची जबाबदारी आहे असे उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून आर्थिक मिली भगत करत असल्याचे दिसून येत आहे ते त्यांची जबाबदारी झटकत असल्याने तालुक्यात त्यामुळे तालुक्यात अवैध धंदे चालकांना पाठबळ मिळत आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की मेहकर पोलीस स्टेशन अंतर्गत देशी विदेशी दारूची विक्री मेहकर तालुक्यात राजरोसपणे सुरू असून प्रत्येक खेडेगावातही ढाबा संस्कृती वाढत चालल्याने अनेक तरुण मुलेही व्यसनाच्या आहारी गेल्याने अनेक कुटुंबात कौटुंबिक कलह होत आहे तसेच कुटुंब उध्वस्त होताना दिसत आहे तर या खुलेआम व राजरोसपणे करत असलेल्या अवैध व्यवसायिकांना ज्याच्यावर कार्यवाही करण्याची जबाबदारी आहेत ते उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी व कर्मचारी हे मात्र मेहकर तालुक्यात महिन्यातून एक ते दोन वेळाच येतात सर्व अवैध व्यवसायिकांना भेटून त्यांचे हित साधून परत जातात जे त्यांना भेटत नाहीत त्यांच्यावर नाममात्र कारवाही करतात यामुळे मेहकर तालुक्यात अवैध देशी विदेशी दारू विक्री व ढाबा संस्कृती वाढत चालल्याचे दिसत आहे तर या व्यवसायिकावर मेहकर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी नाममात्र कार्यवाही करत आहेत परंतु उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी व कर्मचारी नक्की काय काम करतात व त्यांची जबाबदारी काय आहे त्यांचे नक्की काम काय आहे तसेच हा विभाग कशासाठी आहे हा प्रश्न सर्वसामान्य जनतेतून उपस्थित होत आहे
Users Today : 2