बंधाऱ्याच्या पाण्यापासून जमिन वाचविण्यासाठी शेतकर्‍यांचा टाहो

Khozmaster
1 Min Read

सिंदखेडराजा तालुका प्रतिनीधी सुरेश हुसे

सिंदखेडराजा तालुक्यातील निमगांव वायाळ येथील कोल्हापूरी बंधाऱ्याला संरक्षण भित नसल्याचे तसेच बंधाऱ्यात अडकलेले झाडे व प्लेटा न काढल्याने दोन वर्षांपूर्वी नदीपात्रात जास्त पाणी सोडल्याने बंधाऱ्याला लागुन असलेली जमीन 10आर खरडून गेली यावर सर्व शासकीय सोपस्कार पूर्ण होउन पंचनामे झाले मदत तर मिळाली नाही पण उरलेली जमीन वाचविण्यासाठी शेतकर्‍यांनी अधिकारी व राजकीय नेत्यांना भेटुन काहीच फायदा झाला नसल्याची प्रतिक्रिया शेतकर्‍यांनी खोजमासटर न्युज सी बोलताना दिली या बाबत सविस्तर वृत्त असे की निमगाव वायाळ येथे कोल्हापूरी बंधारा बांधकामासाठी शेतकरी डिंगाबर पाडुंरग वायाळ यांनी 2आर जमीन भूसंपादन करून दिली सदर बंधाऱ्यामुळे या परिसरातील नागरिकांची जमीन सिंचनाखाली आली मात्र सदर बंधाऱ्याची पावसाळ्यापूर्वी देखभाल दुरुस्ती करून बंधाऱ्यात अडकून पडलेल्या झाडे काढण्यासाठी खडकपुर्णा सिंचन कार्यालयावर जबाबदारी सोपवण्यात आली तर ते कार्यालय याकडे दुर्लक्ष करत असल्याने या बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणात झाडे अडकल्याने व गावाला संरक्षण भिंत नसल्याने पाण्याचा प्रवाह बंधारा जवळील शेतजमीन खरडुन नेत आहे असाच प्रकार दोन वर्षांपूर्वी झाला असल्याने डिंगाबर वायाळ याची 20आर जमीन असुन पुराच्या पाण्याने 10आर खरडुन गेली सदर महसूल विभागाने या जमीनीचा पंचनामे करून अहवाल शासनाकडे पाठविला मदत तर मिळाली नाही पण उरलेली 10 आर जमीन वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी जिल्हास्तरावर अर्ज देऊन ही काहीच फायदा झाला नसल्याची त्यांनी बोलताना सांगितले

 

0 9 3 7 4 4
Users Today : 2
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *