प्रबोधनात्मक कार्यक्रमांनी साजरी होणार महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती

Khozmaster
3 Min Read

बुलडाणा: अकील शाह/बुलडाणा:क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समितीने प्रबोधनात्मक भरगच्च कार्यक्रमांनी जयंती उत्सव साजरा करण्याचे निश्चित केले असून ११ ते १४ एप्रिल २०२३ दरम्यान, दररोज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रमांना नागरिकांनी अधिकाधिक संख्येने उपस्थित रहावे आणि जयंती उत्सवात सहभाग दर्शवावा, असे आवाहन संयुक्त जयंती उत्सव समितीच्या वितीने करण्यात आले आहे. याबाबत स्थानिक छत्रपति टॉवर येथे समितीचे अध्यक्ष प्रा. सदानंद माळी यांच्या प्रमुख उपस्थितीत ७ एप्रिल रोजी पत्रकार परिषद आयोजित करून माहिती देण्यात आली. यावेळी महात्मा फुले मंडळाचे अध्यक्ष प्रकाश वानेरे, इंजिनीअर सुरेश चौधरी, के.टी. पांडव, गोपाल निळकंठ, पोंगडे, गजानन थिरके, प्रियंका सुरोशे, प्रिती डांगे, रमेश हुडेकर, विशाल खंडारे, प्रिती खंडारे, डॉ.शिवशंकर गोरे, वैभव लाड, सुनिल गोरे, लक्ष्मीकांत बगाडे, रूपनंदन बाघ, निलेश तायडे, राजाभाऊ पांडव, जगदीश मानतकर, वैभव इंगळे, प्रदीप डांगे, विशाल खंडारे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमा नुसार १९ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता महात्मा ज्योतिबा फुले शाळे मध्ये प्रतिमा पूजन व शोभा यात्रा काढली जाणार आहे. याच दिवशी सकाळी ९.३० वाजता शहरातील विविध ठिकाणी असलेल्या महा पुरुषांच्या प्रतिमांना माल्यार्पण केले जाईल. त्याची सुरुवात बुलढाणा बस स्थानका पासून होईल.त्या नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर,मलकापूर रोड बुलढाणा ठिकाणच्या प्रतिमांना अभिवादन केले जाईल.

महात्मा फुले मार्केट येथे आणि नंतर जिल्हा न्यायालया जवळील महात्मा फुले चौकातही अभिवादन कार्यक्रम होईल. राजमाता चौक, जुना मलकापूर रोड बुलढाणा येथे महा पुरुषांच्या प्रतिमांना माल्या अर्पणा नंतर या कार्यक्रमाचा समारोप होईल. पाच दिवशी सकाळी ११ वाजता महात्मा फुले शाळेत रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धे चे आयोजन करण्यात आले आहे. याच ठिकाणी चित्र प्रदर्शन होईल, तर ११.३० वाजता महात्मा फुले लिखोत तसेच त्यांच्या जीवन चरित्रावर आधारित ग्रंथाचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. १९ एप्रिलला संध्याकाळी ६.३० वाजता महात्मा ज्योतीबा फुले माध्यमिक शाळेत अँड, जयमंगल धनराज यांचे सत्यशोधक विचार काळाची गरज या विषयावर व्याख्यान होणार आहे. याच ठिकाणी १२ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता भव्य रोजगार व १३ एप्रिल रोजी रक्तदान शिबिर होणार आहे. सकाळी १० वाजे पासून रक्तदान शिविरास सुरुवात होईल. तर शेवटच्या दिवशी १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव व बक्षीस वितरणाचा कार्यक्रम सकाळी ७ वाजता पार पडणार आहे. या जयंती उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन संयुक्त जयंती समिती च्यावतीने प्रा. सदानंद माळी आदोनी केले आहे.

 

0 9 3 7 4 4
Users Today : 2
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *