
बुलडाणा:(खोज मास्टर ) अकील शाह /बाजार समितीत डोळ्याने दिसतील अशी न भूतो विकास कामे केली आहेत. मी उमेदवार नसलो म्हणजे शिवसेनेचा कुठला उमेदवार नसेल, असे नाही. प्रत्यक्ष निवडणुकीत जिंकण्याची शक्यता कुठेच दिसत नसल्याने विरोधकांनी सत्तेच्या बळाचा दुरुपयोग केला. दबावाखाली निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या उमेदवारांचे अर्ज नामंजूर केले. वास्तविक पाहता अर्जात कुठलीच त्रुटी नसतानाही कुणाच्या हातच्या बाहुले बनलेल्या निवडणूक अधिकाऱ्यांनी अर्ज नामंजूरचा निर्णय घेतला,असा सवाल शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवंत यांनी आज पत्रकार परिषदेत केला. या निर्णयाला आम्ही जिल्हा उपनिबंधकांकडे आव्हान दिले असून, तेथेही न्याय न मिळाल्यास आम्हाला न्यायालया ची दारे उघडीच आहेत, असेही बुधवंत यांनी विरोधकांना बजावले.सहकाराच्या निवडणुकीत पद्धतशीर राजकारण केले जात असल्याचा प्रत्यय सध्या बुलढाणा बाजार समितीत आला आहे. शिंदे गट आणि भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. शिवसेना ठाकरे गटातर्फे जालिंदर बुधवंत, राजू मुळे, सुधाकर आघाव, सुनील गवते, रखमाबाई पिंपळे यांच्या उमेदवारीवर शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, श्रीकांत पवार, धनंजय बारोटे तसेच भाजपचे तालुकाध्यक्ष अॅड.सुनील देशमुख, अॅड. मोहन पवार आणि संदीप उगले यांनी आक्षेप घेतला. त्यांचे अर्ज नामंजूर झाले. या प्रकरणातील तथ्या बाबत जालिंदर बुधवत यांनी पत्रकार परिषदेत आपली बाजू मांडली.यावेळी बुधवंत म्हणाले की, अर्जा सोबतच सहा महिन्यांआधी व्यापारी म्हणून असलेले माझे लायसन्स रद्द केल्याचा पुरावा जोडला होता.त्याबाबत बाजार समिती च्या ठरावा ची प्रतही अर्जा सोबत जोडली होती. रितसर सगळे पुरावे जोडल्यानंतर ही मतदार यादीत नाव कसे आले ? हे जिल्हा उपनिबंधक व तत्सम प्रशासनाने ठरवावे. त्यात आमचा काय दोष? जिल्हा प्रशासनाकडून मागच्या महिन्यात किंवा आधीदेखील काही मृत अधिकारी, कर्मचाऱ्यां ची नावे बदल्यां च्या यादीत आली होती.त्याला दोषी कोण होते? असे प्रकार होत असतात.मात्र, अर्ज छाननी च्या वेळेस नियम, कायदा मोडीत काढून कोणाच्यादबावात अधिकाऱ्यां नी अर्ज रद्द केला,हा खरा संशोधनाचा विषय आहे.या विरोधात आम्ही रितसर अपील दाखल केले आहे.
न्यायासाठी आमचा लढा सुरू राहील,असेही त्यांनी सांगितले
Users Today : 3