स्त्रीमुक्ती क्रांतीचा उगम आणि अंत होती माता यशोधर

Khozmaster
2 Min Read

यशोधराचे नाटय लेखक नारायण जाधव येळगांवकर यांचे चिंतन

बुलडाणा : (खोज मास्टर ) अकील शाह /तथागथ भगवान गौतम बुध्द यांची धर्म पत्नी माता यशोधरा स्त्रीमुक्ती क्रांतीचा उगम आणि अंत होत्या मात्र इतिहासकारांनी त्यांची ही प्रतीमा जगासमोर येवूच दिली नाही. त्यांच्या व्यक्तीत्वाला केवळ एैन युवा अवस्थेत पती सोडून गेलेल्या स्त्रीच्या वियोगी पत्नीच्या रूपातचं तोडूनमोडून प्रस्तुत केले गेले ही अत्यंत दुदैवी गोष्ट असून, माता यशोधरा अडीच हजार वर्षा पुर्वीची अशी नारी होती की जिने आपल्या पित्याने आयोजित केलेल्या स्वयंवराला विरोध करून आपला जिवन साथी निवडण्याच्या स्त्री सुलभ भावनेचे प्रकटीकरण केले. त्यामुळे माता यशोधरेच्या इतिहासाचे पुनर्लेखन करण्याची गरज असल्याचे चिंतन यशोधरा या नाटयकृतीचे लेखक नारायण जाधव येळगांवकर यांनी पत्रकार परिषदेत मांडले तर मी रेखाटलेली माता यशोधरा कपोलकल्पित नव्हे तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या बुध्द आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील चिकित्सेतून उमटलेली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

स्थानिक जीमखाना क्लब येथे 8 एप्रिल 2023 रोजी आयोजित पत्रकार परिषदेत येळगावकर बोलत होते. यावेळी नाटकाचे दिग्दर्शक प्रा. डॉ. दिलीप महालिंगे औरंगाबाद, प्रा.डॉ.सागर जाधव,अशोक दाभाडे,बाबा साहेब जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. यशोधरा नाटय कृतीला नुकताचं नाटय क्षेत्रातील बहुमानाचा राम गणेश गडकरी पुरस्कार मिळाला असल्याची माहिती ही त्यांनी यावेळी दिली. ते पुढे म्हणाले की या नाटय कृतीवर आज पर्यंत एकुण 22 समिक्षा लेख प्रसिध्द झालेत. पन्नास कलाकारांचा संच हा नाटय प्रयोग प्रस्तुत करीत असून आजवर महाराष्ट्रात 9 प्रयोग झाले आहेत तर, आगामी काळात हिंगोली, नांदेड, गंगाखेड, नाशिक, मुंबई, सेलू, सोलापूर, औरंगाबाद, मनमाड, बुलडाणा इत्यादी शहरात प्रयोग होणार आहेत. यशोधरा नाटकाचे दिग्दर्शक प्रा.डॉ.दिलीप महालिंगे यांनी सांगितले की लेखक येळगावकरां नी अडिच हजार वर्षापुर्वी ची माता यशोधरे चा इतिहास सहज साध्या सरळ भाषेत प्रस्तुत केला आहे. यशोधरेवर आजवर अनेक लेखकां नी मांडणी केली मात्र ती काल्पनिक होती. परंतु येळगांवकर यांनी मांडलेली यशोधरा वास्तववादी आणि मनाशी थेट संवाद साधणारी ठरते. प्रारंभी पत्रकार परिषदे मागील भूमिका अशोक दाभाडे यांनी आपल्या प्रस्तावनेतून मांडली. तर आभार प्रदर्शन आयोजक पत्रकार बाबा साहेब जाधव यांनी केले

 

0 9 3 7 4 5
Users Today : 3
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *