विद्यार्थ्यांसाठी निबंध, रांगोळी तसेच घोषवाक्य स्पर्धेचे आयोजन

KHOZ MASTER
3 Min Read

महात्मा ज्योतीबा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर संयुक्त उत्सव समितीचा पुढाकार

बुलढाणा, दि. ८(प्रतिनिधी)क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर संयुक्त उत्सव समितीच्या वतीने ११ ते १४ एप्रिल दरम्यान विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून शालेय विद्यार्थ्यांसाठी निंबध, रांगोळी तसेच घोषवाक्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर संयुक्त उत्सव समितीच्या वतीने ११ एप्रिल रोजी भरगज्ज कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. निबंध स्पर्धा वर्ग ८ ते १२ तसेच खुल्या गटासाठी आयोजित करण्यात आली आहे. वर्ग ८ ते १२ साठी महात्मा ज्योतीराव गोविंदराव फुले व सावित्रीमाई फुले नसल्या तर.., महात्मा ज्योतीराव गोविंदराव फुले व छत्रपती शिवाजी महाराज यांचे संबंध, महात्मा ज्योतीराव गोविंदराव फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे वैचारिक नाते संबंध व मी भिडेवाडा बोलतोय..हे विषय ठेवण्यात आले आहेत. तर खुल्या गटासाठी महात्मा ज्योतीराव गोविंदराव फुले व्यक्तीत्व व विचार, महात्मा ज्योतीराव फुले काल, आज व उद्या, महात्मा ज्योतीराव गोविंदराव फुले यांचे आधुनिक विचार या विषयावर निबंध महात्मा ज्योतीबा फुले प्राथमिक शाळा मुठ्ठे ले आऊट, बुलढाणा येथे संदीप हुडेकर यांच्या १३ एप्रिल पर्यंत जमा करावे, असे आवाहन निबंध स्पर्धा प्रमुख लक्ष्मीकांत बगाडे यांनी केले आहे. या निबंधाचे निरीक्षण व मूल्यांकन प्रा.डॉ.शिवशंकर गोरे, अश्विनी घिरके, वाघमारे, भोरे, उबाळे, हिवाळे करणार आहेत. तर रांगोळी स्पर्धा महात्मा ज्योतीबा फुले प्राथमिक शाळा मुठ्ठे ले आऊट, बुलढाणा येथे ११ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता आयोजित केली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन सरपंच अर्चना वानेरे, प्रियंका सुरोशे यांच्या हस्ते होणार आहे. तर महात्मा ज्योतीराव गोविंदराव फुले यांच्या जीवनावर आधारित चित्रकला स्पर्धा ११ एप्रिल रोजी होणार आहे. यासाठी चित्र घरून काढून महात्मा ज्योतीबा फुले शाळा येथे ११ एप्रिल रोजी स्पर्धा प्रमुख प्रशांत माळी, विठ्ठल जाधव, प्रिती डांगे, वंदना निळकंठ, मेघा जाधव यांच्या कडे जमा करावेत. तर उत्कृष्ट घोषवाक्य स्पर्धेत सहभागी स्पर्धकांनी घोषवाक्य घरून तयार करून महात्मा फुले शाळेत सकाळी ११ वाजता स्पर्धा प्रमुख वैभव इंगळे, प्रदीप डांगे, संदीप हुडेकर, सुनिल गोरे यांच्याकडे जमा करावे. या सर्व स्पर्धेत यशस्वी प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांन बक्षीस वितरण १४ एप्रिल रोजी सकाळी ७.३० वाजता महात्मा ज्योतीबा फुले शाळा, मुठ्ठे ले आऊट येथे करण्यात येणार आहे. तर निबंध स्पर्धेत सहभागी निबंध पुस्तक रूपाने प्रकाशित करण्यात येणार आहे. या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संयुक्त समितीचे जिल्हाध्यक्ष प्रा.सदानंद माळी व समितीच्या सर्व आयोजकांकडून करण्यात आले आहे

0 9 7 2 5 2
Users Today : 15
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *