चिखली धोत्राभनगोजी दै .खोज मास्टर न्यूज. मन्सूर शहा)काल चिखलीच्या आराध्य दैवत असणारे आई रेणुका देवीची यात्रा संपन्न झाली असून आई रेणुका देवीची बहिण फिरंगामाता असून आज वासंतीक महोत्सवानिमित्त एकलारा येथे माता फिरंगामाता देवीचे महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आले. ही परंपरा गेल्या शंभर वर्षांपूर्वीपासून असून ती अगदी आजही एकलारावासीय जपत असून मोठ्या भक्ती भावाने व एकतेने वासंतीक महोत्सव साजरा करतात. यावेळी उपस्थितीत गावातील सरपंच सदस्य तंटामुक्ती अध्यक्ष, पोलीस पाटील, प्रतिष्ठित नागरिक तसेच सर्व भावी भक्तांनी या वासंती महोत्सवाचा आनंद घेतला आहे.
Users Today : 3