पुन्हा एकदा शेतकऱ्यांची फसवणूक रणमोडे, नंतर गाडे, व्यापाऱ्यांनी केले हात वर करोडो रुपयाचा शेतमाल घेऊन शेतकऱ्यांना,आणले रस्त्यावर.

Khozmaster
3 Min Read

चिखली. दै. खोज मास्टर न्यूज (मन्सूर शहा.)

प्राप्त माहिती नुसार चिखली परिसरामध्ये रणमोडे या व्यापाराच्या नंतर गाडे परिवारातील, संतोष मनोहर गाडे व अंकुश मनोहर गाडे यांच्यासह हरदेव ट्रेडर्स एमआयडीसी चिखली यांनी शेतमाल व्यापाऱ्यांनी परिसरातील असंख्य शेतकऱ्याकडून करोडो रुपयाचा शेतमाल खरेदी करून पैसे देण्यासाठी हात वर करून दिल्याची घटना घडल्याने शेकडो शेतकरी रस्त्यावर आले आहेत ८ एप्रिल रोजी काही शेतकऱ्यांनी चिखली पोलीस स्टेशनला याबाबत तक्रार दिली आहे काही महिन्यापूर्वी चिखली परिसरातील रणमोडे नामक व्यापाऱ्याने एमआयडीसीमध्ये गोडाऊन थाटून प्रथम शेतकऱ्यांमध्ये विश्वास निर्माण केला आणि शेकडे शेतकऱ्याकडून करोडो रुपयांचा सोयाबीन हरभरा तूर असा माल, घेऊन पसार झाला होता पोलिसांनी त्याचा त्याला वेड्या ठोक्या मात्र त्या शेतकऱ्याचे पैसे अद्याप पर्यंत मिळाले नसतानाही घटना ताजी असून असताना परत चिखली येथील रहिवासी असलेले संतोष मनोहर गाडे, अंकुश मनोहर गाडे,तसेच हरीदेव , टेडर्स, एमआयडीसी चिखली यांनी परिसरातील शेतकऱ्यांना विश्वास संपादन करून शेतमाल खरेदी केला व आता पैसे देताना हात वर कधी शेतकऱ्यांना विश्वासघात केला आहे ही घटना ७ एप्रिल रोजी उघडकीस आली आहे या संदर्भात पुरुषोत्तम किसनराव जाधव राहणार खंडाळा मकरध्वज रामेश्वर बबन शिंदे ,राहणार एकलारा परिसरातील शेतकऱ्यांनी ८ एप्रिल चिखली पोलीस सात तक्रार दिली आहे .स्थानिक चिखली एमआयडीसी मधील हरी देव ट्रेडर्स व रजिस्टर अडत कंपनीकडे परिसरातील शेतकरी अनेक वर्ष शेतमालाची विक्री करीत आहे. गेल्या दोन तीन महिन्यापासून संतोष मनोहर गाडे व अंकुश मनोहर गाडे व राहणार चिखली यांनी आमचा म** विश्वास संपादन करून खरेदी केला परंतु सदर मालाचे पैसे आरटीजीएस किवा,नगदी स्वरूपात देण्याचे सांगून कालावधीत पुढे ढकलत नेला त्यानंतर ही वेगवेगळ्या तारखा देऊन प्रकरण पुढे ढकलले व दिलेल्या कालावधीत पैसे दिले नाही यादरम्यान आम्ही ५ एप्रिल बुधवार रोजी बोलावलेल्या दिवशी गेलो असता कंपनीला कुलूप असल्याचे निर्देशात आले मोबाईल वरून संपर्क साधला आता परिवारासह सर्वांची मोबाईल बंद असल्याचे लक्षात आल्याने ते फरार झाल्याचे समजल तेव्हा सर्व शेतकरी आपली फसवणूक झाली म्हणून एकत्र आले व आपल्या न्याय हक्कासाठी पोलीस स्टेशन चिखली येथे तक्रार नोंदवली त्यावेळी ठाणेदार चिखली यांनी तात्काळ अटक करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती शेतकऱ्याला दिली आहे. शेतकरी आपल्या तक्रारी लिहितात की हा सर्व प्रकार संताप जनक असून मायबाप शेतकऱ्यांच्या झालेल्या मोठा अन्याय आहे शेतकऱ्यांनी दिलेल्या मालाचे पैसे तात्काळ मिळावे व आरोपी तात्काळ अटक करून न्यायालयात समस्या हजर करावे व आरोपींनी केलेली नादाची की मागणी तात्काळ रद्द करण्यासंदर्भात कारवाई आपल्या स्तरावर तात्काळ करण्यात याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांमध्ये सुनील पाटील हातनी, निंबाजी पाटील हातनी, प्रभाकर भुतेकर गिरोला पुरुषोत्तम जाधव जगाव ठेंग खंडाळा मकरध्वज, सिद्धेश्वर ठेंग खंडाळा मकरध्वज, यांच्यासह जवळपास ६० ते ७० जणांची यादी समोर आली आहे. या सर्वांच्या लाखो रुपयाचा शेतमाल गाडे यांनी विश्वासावर दिलाय अनेक जणांचेकडे पावत्या असून चेक, ही सुद्धा असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे..

 

0 9 3 7 4 5
Users Today : 3
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *