गोकुळसिंग राजपूत राज्यस्तरीय आदर्श पत्रकारितेच्या विभागीय पुरस्काराने सन्मानित

Khozmaster
2 Min Read

 

छत्रपती संभाजीनगर /प्रतिनिधी सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथील या छोट्याशा खेडेगावांतून आपल्या पत्रकारितेच्या लेखणीला सुरुवात करणारे जेष्ठ पत्रकार गोकुळसिंग राजपूत यांनी आपल्या आदर्श आणि शोध पत्रकारितेतून वेगळाच ठसा उमटविला आहे. गोकुळसिंग राजपूत हे सावळदबारा येथे आजी, आजोबा व आपल्या कुटुंबासाहित वास्तव करून सामाजिक कार्य, समाजसेवा करत असताना गेली पंधरा वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये काम करत आहेत, पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी आजपर्यंत विविध प्रश्नांना वाचा फोडली या त्यांच्या कामाची दखल घेऊन वृत्तपत्र क्षेत्रातील प्रतीष्ठेचा राज्यस्तरीय पुरस्कार ७ एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगर शहरातील हाॅटेल वर्षा इन सिडको येथे सहकार मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते देण्यात आला लेखणीद्वारे सर्वसामान्यांच्या व्यथा मांडत, त्यांना न्याय मिळवून देणाऱ्या पत्रकारांना पत्रमहषीॅ स्व.मोहनलालजी बियाणी राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार जेष्ठ पत्रकार गोकुळसिंग राजपूत यांना शाल श्रीफळ व स्मृती चिन्ह देऊन सहकार मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश अध्यक्ष वसंत मुंडे, पुढारी मुंबईचे संपादक चंदन शिरवाळे, दैनिक मराठवाडा साथीचे मुख्य संपादक मा.चंदुलाल बियाणी, प्रशांत जोशी, दैनिक आधुनिक केसरीचे मुख्य संपादक डॉ.प्रभू गोरे, व्यवस्थापक संजय व्यापारी, मराठवाडा साथीचे कार्यकारी संपादक जगदीश बियाणी, विलास शिंगी, मुकेश मुंदडा, साप्ताहिक दर्पणचे समाधान वाणी, दैनिक आनंद नगरीचे सहसंपादक सुनील वाघ, आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

वरील पुरस्कारामुळे मला आणखी चांगले काम करण्याची व समाजाला न्याय देण्याची ताकद मिळेल व या पुरस्काराचे श्रेय मी मला घडविणाऱ्या माझ्या मार्गदर्शकांना देतो कारण त्यांच्या प्रेरणेनेच मला ही ऊर्जा मिळते असे प्रतिपादन पुरस्कारार्थी तथा जेष्ठ पत्रकार गोकुळसिंग राजपूत यांनी यांवेळी केले. तर राजकीय सामाजिक, कला व क्रीडा सर्वच क्षेत्रांतून राजपूत यांचे पुरस्कार मिळाल्याबद्दल मान्यवरांनी अभिनंदन करुन त्यांना पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या. राजपूत यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. सदरील पुरस्कार सोहळा कार्यक्रमाचे प्रास्ताविक दैनिक आधुनिक केसरीचे मुख्य संपादक डॉ प्रभू गोरे यांनी केले यात त्यांनी पुरस्काराचे स्वरूप स्पष्ट केले.

 

0 9 3 7 4 6
Users Today : 4
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *