सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत /सोयगाव तालुक्यातील मोलखेडा येथे कोरोनाच्या काळापासून लालपरी बंद आहे.महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये लालपरिचा वावर सुरु असतांनाही ग्रामीण भागातील रस्त्यावर वावर होतांना दिसत नाही. ग्रामीण भागातील सामान्य नागरीक जेष्ठ नागरिक लालपरीची वाट पाहात आहेत. पण तिचा पत्ताच लागेना आधीच या महागाईच्या काळात ज्येष्ठांना पैशाची वणवण त्यात लालपरीची भेटच होईना.. मग खाजगी पऱ्याला जादा पैसे देऊन प्रवास करावा लागत आहे. तरी सोयगाव आगार व्यवस्थापक यांनी ग्रामीण भागातील लालपरिला सुरू करावे जसे-सोयगांव मोलखेडा, पिंपळवाडी ते सोयगाव या मार्गावरुन एस टी बसची सेवा, लवकरच सुरु करावी अशे लेखी निवेदन सोयगाव आगार प्रमुख हिरालाल ठाकरे यांच्या कडे सरपंच मनिषाताई वारंगाणे यांनी बऱ्याच वेळा दिले असून आगार प्रमुख केराची टोपली समजत आहे.शिंदे-फडणवीस सरकारने २०२३ चा विधानसभेत राज्य सरकारने महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे.की महिलांना आता एसटी प्रवासात आता ५० टक्के सूट मिळणार अशी योजना जाहीर केली आहे मात्र ग्रामीण भागातील जेष्ठ नागरिक व महिलांना याचा फायदा होताना दिसत नाही.अशी प्रतिक्रिया मोलखेडा येथील नागरिकांनी दिली.
Users Today : 4