मंत्री गिरीशभाऊ महाजन यांचे झाले आपल्या गावाकडे झाले दुर्लक्ष
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
जामनेर तालुक्यातील कर्णफाटा हे छोटेसे असून हे गुरप ग्रामपंचायत वाकडी मधे येत असून या गावाला आतापर्यंत पिण्याच्या पाण्याची टाकी शुद्धा नाही साधारण दोनशे घराची वसती असून वाकडी ग्रामपंचायत जोडले गेले आहे.आणि तिथून पाईप लाईन द्वारे कर्णफाटा येथे असलेल्या अतिशय जिर्ण झालेल्या विहीरीत सोडल्या जाते आणि मगच प्रत्येक ग्रामस्थांनी आपल्या पाण्याच्या मोटारीने पाणी भरून घेतात परंतु ग्रामसेवक व सरपंच या गावाकडे फिरकून शुद्धा पाहत नाही येथील ग्रामस्थांना अतिशय दूषित पाणी प्यावे लागत आहे.याकडे प्रशासन लक्ष देईल का अशा प्रश्ननं ग्रामस्थांना पडला आहे.सरपंच व ग्रामसेवक यांना वेळोवेळी सांगून हि काहीच फायदा होत नाही शेवटी दूषित पाणी प्यावे लागत आहे.ज्या गावांमध्ये पाण्याची टंचाई आहे.अशा गावांमध्ये टॅकरद्वारे पाणी पुरवठा प्रशासन करत असते अस्वच्छ पाणी जिथून उपलब्ध असेल तेथून भरुन तो टॅकर गावात उभा केला जातो परंतु येथे या कर्णफाटा गावात घाण,कचरा टाकलेले अतिशय पाणी अशुद्ध नाईलाजाने वापरावे व प्यावे लागत आहे.मात्र वाकडी ग्रामपंचायतने कडे जाणूनबुजून झोपेचे सोंग घेत आहेत याकडे प्रशासनाने त्वरीत लक्ष दिले पाहिजे नाहीतर रोगराई पसविण्यास वेळ लागणार नाही आणि प्रशासन जबाबदार राहिल अशी ग्रामस्थांमधून चर्चाला उधाण आले आहे.गावाला दूषित पाण्यामुळे होता आहे आजार सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु आहेत. विहिरीत पावसाच्या साचलेल्या दूषित पाण्यामुळे अनेक साथीचे रोग पसरत आहे.नकळत दूषित पाणी प्यायलं जातं. त्यामुळे आजारांना सामोरं जावं लागतं. पण जुलाब, उलटी, टायफॉइड, गॅस्ट्रो, विषाणू, जीवाणूंचे आजार, जीवाणूंचे आजार, जंतूची वाढ यांसारखे आजार होतात. याची बहुतांश जणांना माहिती नसते. त्यामुळेच जलजन्य आजारांचे तोटे काय असतात हे सरपंच व ग्रामसेवक यांनी देखील समजून घेतलं पाहिजेत.आणि लवकरात लवकर या विहिरीचा उपासा करून घाण व कचरा साफ करून नंतरचं विहीर भरण्यात यावी नाहीतरी साथीच्या आजारांची साथ आल्यास याला जबाबदार ग्रामपंचायत, सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक जवाबदार राहील अशा गंभीर इशारा येथील ग्रामस्थांनी दिला आहे.
विलाससिंग राजपूत (पाटील) राजपूत करणी सेना अध्यक्ष कर्णफाटा ता जामनेर
Users Today : 4