उपजिल्हा रुग्णालय चे वैद्यकीय अधिकारी,नर्सेस व कर्मचारी जेंव्हा हातात झाडू घेतात

Khozmaster
1 Min Read

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत वैजापूर महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभाग मार्फत दि,७एप्रिल ते१४एप्रिल या काळात”सुंदर माझा दवाखाना” या उपक्रम अंतर्गत राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयात रुग्णालयांची अंतर्गत व बाह्य स्वछता करण्यात येत आहे ,याचाच भाग म्हणून येथील उपजिल्हा रुग्णालयात सोमवार(ता,१०)रोजी स्वच्छतादूत धोंडीरामसिंह राजपूत यांच्या उपस्थितीत वैद्यकीय अधीक्षक डॉ,गजानन टारपे,वैद्यकीय अधिकारी डॉ आशिष पाटणी, डॉ,सुधाकर मुंढे,डॉ,निलेश अंधळकर,व मुख्य परिचारिका रुख्मिनी गवई, व आय,सी,टी, सी,विभागचे विजय पाटील,शशिकांत पाटील यांनी सहकारी सह ट्रामा केअर सेंटर,व उपजिल्हा रुग्णालय परिसर स्वच्छ केला,रोज रुग्णांना तपासणारे हात,इंजेक्शन देणारे हात, यांनी प्रत्यक्ष खराटा हातात घेऊन स्वच्छता केली,सदरील रुग्णालयात दररोज वेगवेगळ्या विभागात व परिसरात स्वच्छता सुरू असून १४एप्रिल पर्यंत स्वच्छता सुरू राहणार आहे,यात विजया जंगम शर्मिला पाडवी,प्रतिभा मुंढे,निवेदिता सिरते, उर्मिला जाधव,विजय पाटील,किसन चौधरी, शशिकांत पाटील,श्याम उचित,भास्कर दुधारे,संजय शिराळे, रामेशवर नारळे, रामेश्वर सोनवणे, डॉ मुंढे, डॉ पाटणी, विजय पाटील, रुख्मिणी गवयी,व स्वच्छता दूत सेवानिवृत्त गटशिक्षण अधिकारी धोंडीराम ध राजपूत व इतर आरोग्य कर्मचारी सहभागी झालेले होते.

 

0 9 3 7 4 6
Users Today : 4
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *