आगामी काळातील सण,उत्सव शांततेत साजरे करावे —- ठाणेदार युवराज रबडेंचे आवाहन

Khozmaster
1 Min Read

सिंदखेडराजा सुरेश हुसे दि.11 यावर्षीच्या एप्रिल महिन्यात होणारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती,अक्षयतृतीया, रमजान ईद,आदी सर्वधर्मियांचे प्रमुख सण आणि उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींनी पुढाकार घेऊन शांततेत पार पाडून साजरे करावेत व कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवावी असे आवाहन किनगावराजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार युवराज रबडे यांनी केले.किनगावराजातील पोलीस ठाण्यात दिनांक १० एप्रिल रोजी घेण्यात आलेल्या शांतता सभेच्या बैठकीत उपस्थित समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींना बहुमोल सूचना देतांना त्यांनी आवाहन केले. सदर बैठकीस किनगावराजा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील राजकीय,सामाजिक क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिक,पोलीस पाटील,तंटामुक्ती अध्यक्ष,सदस्य आदींची जवळपास ८० व्यक्तींची प्रमुख उपस्थिती होती.यावर्षीच्या एप्रिल महिन्यात पहिल्यांदाच हिंदूंचा अक्षयतृतीया सण तर मुस्लिम धर्माचा पवित्र रमजान सण एकाच दिवशी असल्याने समाज कंटकांकडून अशांतता निर्माण होऊ नये यासाठी आगामी काळात होणाऱ्या सण उत्सवाकरिता शांतता बैठकीत एक गाव एकच मिरवणूक, नवीन मिरवणूकीस परवानगी मिळणार नाही, समाजात अशांतता निर्माण होईल अशी आक्षेपार्ह गाणे मिरवणुकीत सादर करू नये, ईतर समाजाच्या किंवा व्यक्तींच्या भावनेस ठेच पोहोचेल असे पोस्टर किंवा बॅनर लावू नये, मिरवणूक परवानगी दिलेल्या मार्गाने शांततेत पार पाडावी, उत्सव साजरा झाल्यानंतर झेंडे ,बॅनर तात्काळ काढावेत,सामाजिक सलोखा जपण्याच्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन करणारे शिबिर आयोजित करणे, अशा सुचना ठाणेदार रबडे यांच्या वतीने देण्यात आल्या.

0 9 3 7 4 6
Users Today : 4
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *