नागपुर खंडपीठाच्या आदेषाने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या त्या 10 उमदेवारांना दिलासा
चिखली/बुलडाणा: कृषी उत्तन्न बाजार समितीच्या होवु घातलेल्या निवडणुकी करीता अर्ज दाखल केलेल्या 10 माजी संचालक उमेदवारांचे नामांकन अर्ज छाणनीच्या दिवषी कृबास अधिनियम 1963 चे कलम 53 अन्वये रद्द करण्यातचे आदेष जिल्हा उपनिबंधक यांनी दिले होते. या प्रकरणी जिल्हा निवडणुक अधिका-याकडे विष्णु पाटील कुळसुंदर व इतर उमेदवारांनी अपील दाखल केली होती. सदर प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचे नागपुर खंडपीठाने याचिका क्रमांक 2318/2023 नुसार जिल्हा उपनिबंधक यांनी दिनांक 03 एप्रिल 2023 रोजी दिलेले ते आदेष रद्द केले. तसेच जिल्हा उपनिबंधक यांना कलम 53 अंतर्गत सदर आदेष पारीत करण्याचा आदेष किंवा अधिकार नाही. अषा स्वरूपाचे ताषारे ओढीत या सबबी खाली ते आदेष आज दिनांक 11 एप्रिल 2023 रोजी रद्द केले. यामुळे राजकीय दबावापोटी नामांकन अर्ज नामंजुर केलेल्या त्या उमेदवारांना खंडपीठाने दिलेल्या निवाडयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. परीणामी होवु घातलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत चुरस निर्माण होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.कृषी उत्पन्न बाजार समिती चिखलीच्या 10 माजी संचालकांविरूध्द जिल्हा उपनिबंधक बुलडाणा यांच्याकडे कलम 40(ब) अंतर्गत दाखल प्रकरणी बाजार समितीचे माजी संचालक विष्णु पाटील कुळसुंदर यांनी सदर प्रकरणामध्ये कलम 43 खाली विभागीय सहकारी संस्था, अमरावती यांच्याकडे अपील दाखल केली होती. तत्कालीन 10 संचालकांनी या निवडणुकीमध्ये आपले नामाकंन अर्ज निवडणुक अधिकारी यांच्याकडे दाखल केले तर सदर प्रकरण प्रलंबीत असल्याचे कारण पुढे करीत अर्ज छापणीच्या दिवषी राजकीय दबावाखाली निवडणुकीच्या दृष्टीकोनातुन महाविकास आघाडीच्या उमेदवारांना बाहेर ठेवण्यासाठी कलम 53 अंतर्गत नामांकन रद्द करण्याची कारवाई केली.या प्रकरणी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुक आधिकारी यांनी दिनांक 05/04/2023 रोजी 10 माजी संचालकांचे नामकांन अर्ज रद्द केले होते. त्या संचालकांनी जिल्हा निवडणुक अधिकारी यांच्याकडे व त्या पाठोपाठ मुंबई उच्च न्यायालयाचे नागपुर खंडपीठात धाव घेतली होती. त्यानुसार आज दिनांक 11 एप्रिल 2023 रोजी जिल्हा उपनिबंधक बुलडाणा यांना कलम 53 नुसार आदेष देण्याचे अधिकार नाही या सबबीखाली 10 माजी संचालकांचे रद्द केलेेले नामांकन अर्ज मंजुर करावेच लागतील असे दिसुन येते. जिल्हा उपनिबंधक यांनी कोणतेही आदेष किंवा अधिकार नसतांना फक्त राजकीय दबावाखाली निवडणुकीच्या तोंडी अतिषय घाईगरबडीने सन 2017 मध्ये दाखल प्रकरणी 03 एप्रिल 2023 रोजी आदेष पारीत केला. तसेच कलम 53 चे आदेष संचालकांना छाननीच्या दिवषी का देण्यात आले यातील गोंडबंगाल काय याबाबत तर्क वितर्क लावण्यात येत आहे. एकंदरीत नागपुर खंडपीठाने कलम 53 चे आदेष रद्द केल्याच्या दिलेल्या निवाडयामुळे ते 11 माजी संचालक सर्वश्री विष्णु पाटील कुळसुदर, डॉ. सत्येंद्र भुसारी, गजानन पवार, विजय शेजोळ, रूपराव सावळे, ईष्वर इंग्ळे, संजय गाडेकर, मनोज खेडेकर, सुमनबाई म्हस्के, काषिनाथ बोंद्रे या उमेदवारांना दिलासा मिळाला असुन निवडणुक चुरषीची ठरणार असल्याचे चित्र पाहवयास मिळत आहे.
Users Today : 4