बुलडाणा ( प्रतिनिधी) : स्त्री शिक्षणाच्या पायाची मुहूर्तमेढ रोवणारे महान क्रांतीकारक आणि थोर विचारवंत, समाजसेवी महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती ११ एप्रिल रोजी बार्टी या संस्थेच्या समतादूत प्रकल्पातर्फे जि.प.उर्दू प्राथ.शाळा अंबाशी येथे मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम महात्मा फुले यांच्या प्रतिमेस माजी उपसरपंच प्रकाश पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच महात्मा ज्योतिबा फुले यांनी सामाजिक प्रबोधन, अस्पृश्यता व जातिव्यवस्थेचे निर्मूलन, आणि स्त्रियांना व मागास जातीच्या लोकांना शिक्षण देण्याचे कार्य केले, असे मत याप्रसंगी प्रकाश पवार यांनी व्यक्त केले. तर समतादूत मोहसिन खान बिसमिल्ला खान यांनी महात्मा फुले यांच्या जीवन कार्याचा परिचय देऊन केलेल्या कार्यावर प्रकाश टाकला. सदर कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक अकिल सौदागर सर, पदवीधर शिक्षक सय्यद राहत सर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शेख रहीम, हसन कुरेशी, शेख इम्रान, सामाजिक कार्यकर्ते मो.अजहर, सै.अजहर, सै. ताहेर इ. पाणी पुरवठा कर्मचारी नंदकिशोर तिरके इ. उपस्थित होते.
क्रांतिसूर्य महात्मा फुले यांची जयंती साजरी
0
9
3
7
4
6
Users Today : 4
Leave a comment