चिखली दै. खोज मास्टर न्यूज (मन्सूर शहा). चिखली तालुक्यातील व परिसरातील शेतकऱ्यांचे पैसे थकीत करणारा शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या गाडे बंधू वर कारवाई करावी अशी मागणी स्वाभिमानीचे नेते रविकांत भाऊ तुपकर यांनी बुलढाणा जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे .रविकांत तुपकर यांनी दिलेल्या निवेदन म्हटले आहे की चिखली तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतमाल चिखली येथील व्यापारी संतोष गाडे व त्यांचे बंधूंना विकला होता परंतु गाडी बंधूंनी पैसे आरटीजीएस करतो किंवा काही दिवसांनी देतो असे म्हणून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची पैसे थकले आहे व आता ते फरार असल्याची माहिती समोर येत असून या संदर्भात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची तक्रारी येत आहे तसेच शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना उधारीत आपला शेतमाल विकू नये असे आव्हान देखील शेतकरी नेते रविकांत भाऊ तुपकर यांनी केले आहे .तसेच फसवणूक करणाऱ्या अशा व्यापाऱ्यावर क** कारवाई होणे आवश्यक आहे तरी शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या गाडे बंधूंची खाजगी संपत्ती जप्त करून शेतकऱ्यांचे पैसे मिळवून द्यावी व त्यांच्यावर क** कारवाई करण्यात यावी अशा आशियाचे निवेदन रविकांत भाऊ तुपकर यांनी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना दिलेली आहे.
Users Today : 4