महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी

Khozmaster
1 Min Read

प्रतिनिधी:-शिवाजी उदार मेराखुर्द:- शिक्षणाचे जनक थोर समाज सुधारक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.जयंतीनिमित्त जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना पेन व पेन्सिल वाटप करण्यात आली.त्यानंतर संध्याकाळी पाच वाजता गावातून मिरवणूक काढण्यात आली.मिरवणुकीच्या सुरुवातीलाच महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून मिरवणुकीला सुरुवात झाली.त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करून आरती करण्यात आली.त्यानंतर मिरवणूक पुढे सुरू ठेवण्यात आली.मिरवणुकीत सर्व समाजातील लोकांनी प्रतिसाद देऊन मिरवणुकीची शोभा वाढविली.व नंतर शेवटी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून मिरवणुकीची सांगता करण्यात आली.

 

0 9 3 7 4 6
Users Today : 4
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *