क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक उत्सव समिती ऊर्जा नगर वसाहत चंद्रपूर यांच्या विद्यमाने, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्ताने, ठाण्यातील वकील तथा सामाजिक कार्यकर्ते ॲड. प्रज्ञेश चैतन्य सोनावणे यांचे जाहीर व्याख्यान होणार आहे. विषय फुले शाहू आंबेडकर विचारधारा आणि आपली जबाबदारी. दिनांक १४ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ११ वाजता, खुले रंगमंच पटांगण, ऊर्जा नगर वसाहत, महाऔष्णिक विद्युत केंद्र, चंद्रपूर येथे होणार आहे. फुले शाहू आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन समिती कडून करण्यात आले आहे.
[
Users Today : 5