बुलडाणा 🙁 खोज मास्टर) अकील शाह/ बुलढाणा सार्वजनिक वितरण व्यवस्थेत वितरीत करण्यात येणाऱ्या शिधाजिन्नसाचे वितरण पात्र लाभार्थ्यांना होण्याबाबत लाभार्थ्यांच्या प्रतिक्रिया स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाणून घेणार आहेत.यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून ५० लाभार्थी गुरूवार, दि. १३ एप्रिल रोजी सायंकाळी ४.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हीडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून सहभागी होतील.या संवादात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अन्न, नागरी पुरवठा मंत्री रविंद्र चव्हाण सहभागी होतील. यावेळी आनंदाचा शिधा संचाचे वितरण,धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर राशी, शिवभोजन थाळी या योजनेतील लाभार्थ्यांशी संवाद साधण्यात येणार आहे.या योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांपैकी प्रत्येक जिल्ह्यातील सुमारे ५०लाभार्थी जिल्हा ठिकाणावरील राष्ट्रीय सूचना केंद्रामधून व्हीडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून सहभागी होतील.यातील निवडक लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री संवाद साधतील.
Users Today : 5