महात्मा जोतिबा फुले योजनेतून अवघ्या ४० दिवसांच्या बाळाला मिळाले जीवदान

Khozmaster
1 Min Read

डॉक्टरांच्या आणी शरीफशाह यांच्या प्रयत्नांना यश.

बुलढाणा : (खोज मास्टर ) अकीलशाह /तालुक्यातील देवळघाट येथील अवघ्या ४० दिवसांच्या बाळाला महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजने अंतर्गत सुमारे 25 दिवसापासुन व्हेंटिलेटरवर नंतर आक्सिजनवर ठेवुन सोबतच योग्य उपचार करीत बाळाला चांगले करण्यात डॉक्टरांना मोठे यश मिळाले आहे.देऊळघाट येथील रहिवासी असलेले शेख अनिस यांचा अवघ्या ४० दिवसांचा बाळ गेल्या महिन्या भरापासून निमोनिया आणि इतर संसर्गजन्य रोगामुळे त्रस्त होता. गेल्या मार्च महिन्यात बाळाला बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, मात्र सुविधाअभावी बाळाला अकोला येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तब्बल 10 दिवस अकोल्याच्या रुग्णालयात जाऊनही प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने बुलढाणा येथील महात्मा फुले योजनेचे समन्वयक शरीफ शाह यांना बाळाची फाईल पाठवण्यात आली. नंतर गंभीर अवस्थेत बाळाला अकोल्याहून बुलढाणा येथे हलवण्यात आले. शहरातील योजनेचे एनआयसीयु मध्ये भरती केल्यानंतर उपचार सुरू करण्यात आले. सुमारे 25 दिवस मोफत व्हेंटिलेटरवर नंतर ऑक्सिजनवर ठेवून योग्य उपचार केल्याने आज बुधवारी 12 एप्रिल 2023 रोजी बाळाला पूर्णपणे बरे करून त्याच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. बाळाला भरती केल्यापासून ते तब्येत चांगली होई पर्यंत महात्मा ज्योतीराव फुले योजनेचे समन्वयक शरिफ शाह, बालरोग तज्ञ डॉ. गाडेकर, डॉ. गडाख, डॉ. लहाने इतर स्टाफने परिश्रम घेतले.

 

0 9 3 7 4 7
Users Today : 5
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *