बुलडाणा: ( खोज मास्टर)अकील शाह /आगामी येणा-या काळात डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती रमजान ईद या सणांच्या पाश्वभुमीवर बुलडाणा शहारात दि.११ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास रुट मार्च करण्यात आला आहे. बुलडाणा शहर पोलीस स्टेशन पासुन हा रुट मार्ट करण्यात आला आहे. राज्यातील विविध शहरातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती लक्षात घेता बुलडाणा शहर पोलीस स्टेशन, भोडे सरकार चौक, कारंजा चौक, जनता जयस्तंभ चौक, स्टेट बैंक चौक, तहसील चौक, परत बुलडाणा शहर पोलीस स्टेशन असा या मार्ग संपुर्ण बुलडाणा शहरात हा रूट मार्च काढण्यात आला. या रूट मार्च मध्ये शीघ्रकृती दलाचे मुंबई येथील ४ अधिकारी यांच्यासह ७७ अंमलदार, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम, बुलडाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद काटकर तसेच शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी व १०२ बटालियन आर ए एफ नवी मुंबई श्रीमती नेहा यादव सहायक कमांडेंट, श्री संतोष कुमार यादव सहायक कमांडोन्ट, निरीक्षक गुलाबसिंह, निरीक्षक कृपाचंद स्वामी इत्यादीसह अन्य सैनिक उपस्थित होते. यावेळी शिस्तबद्ध पद्धतीने बुलडाणा शहरातून रुट मार्च काढण्यात आला आहे.
Users Today : 7