बुलडाणा ( प्रतिनिधी) : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती बार्टी व जि.प.उर्दू शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने जि.प.उर्दू प्राथ.शाळा अंबाशी येथे साजरी करण्यात आली. सर्वप्रथम शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शेख रहीम यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच मान्यवरांच्या हस्ते देखील पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी समतादूत मोहसिन खान बिसमिल्ला खान यांनी डॉ.बाबासाहेब हे अष्टपैलू व्यक्तीमत्व होते. त्यांना प्रत्येक क्षेत्राचे परिपूर्ण ज्ञान व माहिती होती, असे मत याप्रसंगी व्यक्त केले. कार्यक्रमासाठी माजी उपसरपंच शेख साबीर, मुख्याध्यापक अकिल सौदागर सर, पदवीधर शिक्षक सय्यद राहत सर, शेख लड्डू, हसन कुरेशी, सय्यद आगा भाई, गुलशेर खा पठान, मस्तान कुरेशी, शेख मुरसलिम, इमरान खा, सामाजिक कार्यकर्ते मो.अजहर, शेख सोहिल, शेख कादिर इ. उपस्थित होते.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणजे अष्टपैलू व्यक्तीमत्व – समतादूत मोहसिन खान
0
9
3
7
4
8
Users Today : 6
Leave a comment